Jio, Airtel, Vodafone-Idea : कंपन्याकडून 547 GB पर्यंत डेटाची ऑफर, कोणता प्लॅन बेस्ट

Jio, Airtel, Vodafone-Idea : कंपन्याकडून 547 GB पर्यंत डेटाची ऑफर, कोणता प्लॅन बेस्ट

रिचार्जचे दर वाढल्यानंतर कंपन्यांनी ग्राहकांना जास्त मुदतीचे बेस्ट प्लॅन ऑफर केले आहेत. यामध्ये इंटरनेटसह अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर फायदे दिले जात आहेत.

  • Share this:

टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी टेरिफ चार्जेस वाढवल्याने रिचार्जच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे. रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी 2121 रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. यात 336 दिवसांची मुदत दिली होती. यासह दररोज इंटरनेट, फ्री एसएमएस आणि कॉलिंगचे फायदे दिले होते. रिलायन्स जिओशिवाय एअरटेल आणि व्होडाफोननेसुद्धा एक वर्षाच्या मुदतीच्या प्लॅनची ऑफर दिली आहे.

रिलायन्स जिओचा 2121 रुपयांचा प्लॅन 336 दिवसांच्या मुदतीचा आहे. यात ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. या हिशोबाने युजर्सना एकूण 504 जीबी डेटा मिळेल. याशिवाय जिओ टू जिओ अनलिमिटेड तर जिओ व्यतिरिक्त इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12 हजार मिनिटे मिळणार आहेत. तसंच दररोज 100 एसएमस मिळतील. यामध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शनही मिळेल.

एअरटेलनं जिओप्रमाणेच वर्षभरासाठी प्लॅन दिला आहे. 365 दिवसांच्या या प्लॅनसाठी 2 हजार 398 रुपये मोजावे लागतील. यात दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. दररोज दीड जीबी प्रमाणे मिळून वर्षात तुम्हाला 547.5 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यामध्ये कॉलिंग अनलिमिटेड असणार आहे. तसंच एअरटेल अॅपचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. तसेच या प्लॅनच्या सबस्क्राबर्सना FASTag च्या खरेदीत 150 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

वाचा : Airtel चा मोठा झटका! खूप महाग झाला स्वस्तातला प्लान, आता येणार जास्त बिल

व्होडाफोननेसुद्धा वर्षभरासाठी प्लॅन लाँच केला आहे. त्यामध्ये दररोज 100 एसएमएस आणि दीड जीबी इंटरनेट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. 2399 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 365 दिवस असणार आहे. यात 499 रुपयांच्या व्होडाफोन प्ले चे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. तसंच झी5 चा 999 रुपयांचा फ्री अॅक्सेस मिळेल.

वाचा : Jio, Vodafone-Idea, Airtel चे बेस्ट प्लॅन, दररोज 2 GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉल

First published: February 22, 2020, 12:06 PM IST

ताज्या बातम्या