Home /News /technology /

Realme चा Narzo 50i स्मार्टफोनचे अफलातून फिचर्स, 10 हजारांच्या आत किंमतीतला जबरदस्त स्मार्टफोन

Realme चा Narzo 50i स्मार्टफोनचे अफलातून फिचर्स, 10 हजारांच्या आत किंमतीतला जबरदस्त स्मार्टफोन

रिअलमी नार्झो 50i (Realme Narzo 50i) या स्मार्टफोनची माहिती इथे देत आहोत.

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: रिअलमी या स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच झालेल्या आपल्या सोहळ्यात दोन नवे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. त्यापैकी रिअलमी नार्झो 50i (Realme Narzo 50i) या स्मार्टफोनची माहिती इथे देत आहोत. या फोनची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी किंमतीच्या या फोनमध्ये तब्बल 5000 mAh क्षमतेची बॅटरी आणि Unisoc 9863 SoC चिपसेट देण्यात आला आहे. रिअलमी नार्झो 50i या स्मार्टफोनच्या 2GB RAM+32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,499 रुपये, तर 4GB RAM+64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. सात ऑक्टोबरपासून हा फोन realme.com आणि फ्लिपकार्ट, तसंच मेनलाइन रिटेल चॅनेलमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

हेही वाचा- सतत Bluetooth किंवा Wireless Headphones चा वापर करताना सावधान, होऊ शकतो गंभीर आजार

 Realme Narzo 50i ची फीचर्स
या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच आकाराचा असून, स्क्रीन टू बॉडी रेशो 89.5 टक्के एवढा आहे. हा फोन Unisoc 9863 चिपसेटवर काम करतो. या फोनमध्ये Android 11 वर आधारित Realme UI Go व्हर्जन देण्यात आली आहे. हा फोन रॅम आणि स्टोरेज मेमरीनुसार दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 2GB RAM+32GB स्टोरेज आणि 4GB RAM+64GB स्टोरेज असे ते दोन प्रकार आहेत. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साह्याने 256 जीबीपर्यंत वाढवणं शक्य आहे.

हेही वाचा- Amazing! अवघ्या 12 व्या वर्षी या पठ्ठ्याने कमावले 3 कोटी रुपये, जाणून घ्या काय केलं काम?

 या फोनमध्ये f/2.0 अ‍ॅपर्चरचा 8 मेगापिक्सेल AI रिअर कॅमेरा आणि f/2.2 अ‍ॅपर्चरचा 5 मेगापिक्सेल AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी. Realme Narzo 50i या फोनला 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्या बॅटरीमुळे फोनला 43 दिवसांचा स्टँडबाय टाइम देण्यात आला आहे. या फोनचं वजन 195 ग्रॅम आहे. या फोनला 3.5mm ऑडिओ जॅक, मायक्रो यूएसबी पोर्ट, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2 हे कनेक्टिव्हिटीचे पर्याय आहेत. त्यामुळे कमी किंमतीत हा फोन चांगली फीचर्स देतो.

हेही वाचा-  केवळ 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट करता येणार तुमचा Mobile Number, SIM Card बाबत नवा नियम जारी

Realme C21Y हा यापूर्वीचा स्मार्टफोनही चांगला आहे. त्या स्मार्टफोनला 6.5 इंचांचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला ऑक्टाकोअर Unisoc T610 प्रोसेसर असून, ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज अशा व्हॅरिएंटची किंमत 8999 रुपये असून, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा व्हॅरिएंटची किंमत 9999 रुपये आहे. 5000 mAh क्षमतेची बॅटरी त्याला देण्यात आली आहे. या फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सरही देण्यात आला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Realme, Smartphone

पुढील बातम्या