Home /News /technology /

भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme Narzo 30 Pro 5G भारतात लाँच झाला असून सगळ्यात कमी किंमतीत असणारा हा पहिला 5G फोन आहे. 4 मार्चला या फोनचा पहिला सेल होणार आहे. ग्राहक Realme.com आणि फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करू शकतील.

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: मागील अनेक दिवसांपासून बहुचर्चित रियलमीने नार्जो 30 प्रो 5G (Realme Narzo 30 Pro 5G) आणि रियलमी नार्जो 30A (Realme Narzo 30A) लाँच केले आहेत. महत्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन 4G नव्हे तर 5G असणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम अशा दोन व्हेरिएन्टमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर 128 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज देखील यात मिळणार आहे. Realme Narzo 30 Pro हा सर्वात स्वस्त असणारा 5G स्मार्टफोन ठरणार आहे. 64 जीबी व्हेरिएन्टची किंमत ही 16,999 रुपये, तर 128 जीबी व्हेरिएन्टची किंमत 19,999 रुपये असणार आहे. या फोनची वैशिष्ट्यं - Realme Narzo 30 Pro 5G मध्ये 6.55 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळणार आहे. त्याचबरोबर फोनमध्ये MediaTek Dimensity 800U हा प्रोसेसर दिला आहे. तसंच हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 OS सिस्टीममध्ये असेल. या फोनसोबत 65 व्हॅट फास्ट चार्जर देखील मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा असे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी देखील 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 5000mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे. याचबरोबर फास्ट चार्जिंगसाठी 30W चा चार्जर देखील देण्यात आला आहे. 65 मिनिटांमध्ये 100 टक्के बॅटरी चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याचबरोबर फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी सारखे फीचर देखील देण्यात आले आहेत.

(वाचा -   सावधान! क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये अँड्रॉइड app ठरतंय धोकादायक; कार्ड वापरताना घ्या काळजी)

दरम्यान, 4 मार्चला या फोनचा पहिला सेल होणार आहे. यामध्ये ग्राहक कंपनीच्या Realme.com आणि फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करू शकतील. 5जी कनेक्टिव्हिटीची भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. अत्यंत वेगाने इंटरनेट मिळणार असल्याने, तो स्पीड मिळण्यासाठी चांगल्या कंपनीचा फोन असणंही गरजेचं आहे. त्यामुळे नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या स्मार्टफोनचा विचार करू शकता.
First published:

Tags: Realme, Tech news

पुढील बातम्या