सावधान! क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये अँड्रॉइड app ठरतंय धोकादायक; कार्ड वापरताना घ्या काळजी

सावधान! क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये अँड्रॉइड app ठरतंय धोकादायक; कार्ड वापरताना घ्या काळजी

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून पेमेंट करताना फसवणूक व्हायचं प्रमाण वाढलं आहे. हॅकर्सनी कार्ड यूजरला फसवण्यासाठी नवीनच app शोधून काढलं आहे. कार्ड वापरताना कुठल्याही शॉर्टकटच्या फंदात पडू नका आधी हे वाचा.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : निमित्त कोणतंही असेल तर खरेदी ही आलीच. सतत कोणत्या नं कोणत्या कारणाने खरेदी चालू असतेच. मात्र खरेदी झाल्यानंतर पेमेंट करताना मात्र सावध राहा. कारण पेमेंट करताना तुमची फसवणूक होऊ शकते. एका Android app द्वारे हॅकर्स तुमच्या कार्डमधली सिक्युरिटी सिस्टीम हॅक करतात आणि कार्डवरून तुमच्या नकळत अधिक रक्कम काढली जाऊ शकते. यासाठी काय काळजी घ्यायची?

खरेदी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी तुमच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड द्वारे तुम्ही दोन प्रकारे पेमेंट करू शकता. एक प्रकार म्हणजे कॉन्टक्टलेस पद्धतीचा. नुसतं टॅप करून तुम्ही पैसे देऊ शकता. सध्या याद्वारे भारतात 5000 पर्यंतच्या रकमेचं पेमेंट करू शकता. दुसरा  प्रकारामध्ये पेमेंट टर्मिनलचा वापर करून पैसे देणे. इथे मात्र कार्ड पिनची आवश्यकता असते. याचाच वापर करून हॅकर्स पिन येण्याचा पर्यायच बायपास करतात.

एका संशोधनातून अस सांगण्यात आलं आहे की, हॅकर्स फक्त एका android app चा वापर करून तुम्हाला चुकीचा संदेश पाठवू शकतात आणि तुमची फसवणूक करू शकतात. पेमेंटच्या वेळी तुम्हाला पिनची आवशक्यता नाही,  असा मेसेज येऊ सकतो. ETC Zurich च्या संशोधनात याबद्दल माहिती समोर आली आहे. मास्टरकार्ड (mastercard ) किंवा माएस्टरो (maestro)यांचं क्रेडिट कार्ड शॉर्टकट पद्धतीने वापरण्यासाठीचा पर्याय निवडला तर धोका उद्भवू शकतो.

या संशोधनात एका android app आणि nfc असणाऱ्या दोन फोनचा वापर करण्यात आला. या app ने कार्ड टर्मिनलवर चुकीचा संदेश दिला. पेमेंट स्वीकारलं जातंय अशा अर्थाचा संदेश फेक होता. त्याचबरोबर हेसुद्धा सांगण्यात आलं कि कार्ड मालकाची ओळख पटवून घेण्यात आली आहे आणि आता पेमेंट साठी पिनची आवश्यकता नाही.

प्रत्यक्षात तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करता त्या वेळी अँड्रॉइड अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा लीक झालेला असतो आणि तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं.

(हे पहा : Bank Holidays: मार्च महिन्यात 11 दिवस बंद राहणार बँका, आधीच करा तुमची कामं   )

कशा पद्धतीने पेमेंट सिस्टीमला चकमा देण्यात येतो –

ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या प्रक्रियेत एकाच वेळी दोन पद्धतीने काम केलं जातं. जेव्हा कार्ड टर्मिनल ट्रान्झॅक्शन पूर्ण करतं, त्याच वेळी तो मास्टरकार्ड टॅन्झक्शन करत असतं.

मास्टरकार्डला याबाबतीत सावधानतेचा इशारा –

रिसर्चरने याबद्दलची माहिती मास्टरकार्डला दिली आहे.त्यानुसार काही ठिकाणी यावर सुरक्षित उपायही लागू करण्यात आले आहेत. EMV मुळे हा प्रॉब्लेम होत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

Published by: Aiman Desai
First published: February 24, 2021, 3:55 PM IST

ताज्या बातम्या