Home /News /technology /

Instagram व्हिडिओ मोबाईल किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करायचेत? इथं क्लिक करा

Instagram व्हिडिओ मोबाईल किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करायचेत? इथं क्लिक करा

तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल आणि त्यावरील व्हिडिओ डाउनलोड (Video Download) करायचे असतील तर टेन्शन घेऊ नका. मोबाईल असो की डेस्कटॉप तुम्हाला कोणत्याही डिव्हाईसवरुन आता व्हिडीओ डाऊनलोड करता येईल.

    मुंबई, 20 नोव्हेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे (Social Media Platforms) आता बहुतांश व्यक्तींच्या आयुष्यातले अविभाज्य घटक झाले आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम ही सध्याची सर्वाधिक पसंतीची सोशल मीडिया अॅप्स आहेत. विशेषत: तरुणाईत इन्स्टाग्राम (Instagram) हे अॅप अधिक लोकप्रिय आहे. कारण यावर फोटो, व्हिडिओ शेअर करता येतात. हे सोशल मीडिया अॅप मेटा (फेसबुक) कंरनीच्या मालकीचं असून, टिकटॉकवर बंदी आल्यानंतर यात शॉर्ट व्हिडिओचं फीचर अॅड करण्यात आलं. तेव्हापासून या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर फोटो, व्हिडिओ अपलोड करता येतात, तसंच यावरचा एखादा व्हिडिओ आवडला असेल तर तो डाउनलोडही करता येतो. यासाठी एक अत्यंत सोपा मार्ग आहे. इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड (Video Download) करणं खूप सोपं आहे; मात्र त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावं लागतं. कारण कंपनीने आपल्या अॅपमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी कोणतीही सुविधा दिलेली नाही. इन्स्टाग्राम व्हिडिओ डेस्कटॉपवर कसे डाउनलोड करावेत? तुम्ही थर्ड पार्टी वेबसाइटद्वारे तुमच्या डेस्कटॉपवर (Desktop) इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करू शकता. त्यासाठी savefrom.net ही वेबसाइट उपयुक्त ठरते. सर्वांत आधी तुमच्या ब्राउझरवर savefrom.net शोधा आणि ती वेबसाइट उघडा. त्यानंतर डेस्कटॉपवर तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट उघडा. तुम्हाला जो व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, त्याची लिंक कॉपी करा आणि savefrom.net वर दिलेल्या बॉक्समध्ये ती लिंक पेस्ट करा. त्यानंतर डाउनलोड या बटणावर क्लिक करा. संबंधित व्हिडिओ डेस्कटॉपवर डाउनलोड झालेला असेल. मोबाइल फोनवरदेखील इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करता येतात. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता. यापैकी व्हिडिओ डाउनलोडर फॉर इन्स्टाग्राम (Video Downloader for Instagram) हे अॅप वापरून तुम्ही कोणताही व्हिडिओ सहजपणे सेव्ह करू शकता. मोबाइल फोनवर इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी सर्वांत प्रथम गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) उघडा. व्हिडिओ डाउनलोडर फॉर इन्स्टाग्राम (Video Downloader for Instagram) हे अॅप डाउनलोड करा. आता इन्स्टाग्राम उघडा आणि तुम्हाला डाउनलोड करायचा असलेल्या व्हिडिओवर जा. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा. कॉपी लिंक या पर्यायावर टॅप करा. आता व्हिडिओ डाउनलोडर (Video Downloader for Instagram) अॅप उघडा. हे अॅप आता तुम्ही कॉपी केलेली लिंक आपोआप पेस्ट करील आणि व्हिडिओ डाउनलोड करणं सुरू होईल.
    First published:

    Tags: Instagram, Social media, Video

    पुढील बातम्या