मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Realme चा खास Festive Sale, कमी दरात मिळतोय 5G स्मार्टफोन

Realme चा खास Festive Sale, कमी दरात मिळतोय 5G स्मार्टफोन

मोबाईल निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या रियलमी या ब्रँडनं देखील फेस्टिव्ह डेज सेल (Realme Festive Days Sale) सुरू केला आहे.

मोबाईल निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या रियलमी या ब्रँडनं देखील फेस्टिव्ह डेज सेल (Realme Festive Days Sale) सुरू केला आहे.

मोबाईल निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या रियलमी या ब्रँडनं देखील फेस्टिव्ह डेज सेल (Realme Festive Days Sale) सुरू केला आहे.

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: सध्या सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. या काळात अनेकजण नवीन गॅझेट्स घेण्याला प्राधान्य देतात. कारण, दिवाळीनिमित्त विविध कंपन्या आपल्या प्रॉडक्टवर भरघोस सूट देतात. मोबाईल निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या रियलमी या ब्रँडनं देखील फेस्टिव्ह डेज सेल (Realme Festive Days Sale) सुरू केला आहे. कालपासून (4 नोव्हेंबर 2021) सुरू झालेला हा सेल पाच दिवस (8 नोव्हेंबर 2021) चालणार आहे. रियलमीच्या या सेल दरम्यान स्मार्टफोन्सपासून ते इयरबड्सपर्यंतच्या अनेक गोष्टी खूप कमी किंमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतात. या सेलमध्ये रियलमी 8 (Realme 8) हा 5जी (5G) फोन सवलतीच्या दरात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. तीन वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरियंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

रियलमी 8च्या तीन व्हेरियंटपैकी, 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला फोन 15 हजार 499 रुपयांना मिळतो. तर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन 16 हजार 499 रुपयांना उपलब्ध आहे. 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या रियलमी 8 फोनची किंमत 17 हजार 499 रुपये आहे. मात्र, रियलमीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये, 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या हाय एन्ड फोनवर 1 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. एवढंच नाही तर ग्राहकांना MobiKwik अंतर्गत या फोनवर 350 रुपयांची अतिरिक्त सूट आणि फ्री रिचार्जद्वारे 75 रुपयांचा कॅशबॅकसुद्धा मिळू शकतो.

हेही वाचा-  WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

 रियलमी 8 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 8 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा, 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला फुल एचडी प्लस (HD+) डिस्प्ले मिळत आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या प्रायमरी व्हेरियंटमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर दिलेलं आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं फोनची स्टोरेज क्षमता 1टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

हेही वाचा-  चुकूनही वापरु नका WhatsApp चं हे अनधिकृत वर्जन; Account होऊ शकतं बॅन

रियलमी 8 5जी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर आहेत. याशिवाय सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

5000mAhची दमदार बॅटरी

सुपरसॉनिक ब्लॅक (Supersonic Black) आणि सुपरसॉनिक ब्लू (Supersonic Blue) या दोन कलर व्हेरियंटमध्ये रियलमी 8 5जी उपलब्ध आहे. या फोनमध्ये '18W क्विक चार्ज' या फास्ट चार्जिंग सपोर्ट 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर, रियलमीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये तुम्हाला चांगला पर्याय मिळू शकतो.

First published:

Tags: Realme, Smartphones