मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Realme 7 pro झाला स्वस्त; 8GB RAM साठी मोजा केवळ इतके पैसे

Realme 7 pro झाला स्वस्त; 8GB RAM साठी मोजा केवळ इतके पैसे

8 जीबी आणि 128 जीबी रॅम असणाऱ्या या फोनवर मिळणारी ही ऑफर एक जुलैपासून सुरू झाली असून ती चार जुलैपर्यंतच मिळणार आहे.

8 जीबी आणि 128 जीबी रॅम असणाऱ्या या फोनवर मिळणारी ही ऑफर एक जुलैपासून सुरू झाली असून ती चार जुलैपर्यंतच मिळणार आहे.

8 जीबी आणि 128 जीबी रॅम असणाऱ्या या फोनवर मिळणारी ही ऑफर एक जुलैपासून सुरू झाली असून ती चार जुलैपर्यंतच मिळणार आहे.

मुंबई 3 जुलै: तुम्हाला स्वस्त किमतीत दर्जेदार आणि आकर्षक स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिअलमी (Realme) या लोकप्रिय स्मार्टफोन उत्पादक कंपनीनं आपल्या रिअलमी 7 प्रो (Realme 7 pro) या स्मार्टफोनची Sun Kissed Leather आवृत्तीची किंमत तीन हजार रुपयांनी कमी (Price discount) केली आहे. त्यामुळं मूळ 21 हजार 999 रुपये किमतीचा हा फोन 19 हजार 999 रुपये या आकर्षक किमतीला मिळत आहे. रिअलमी डॉट कॉमवर ही माहिती देण्यात आली आहे.

8 जीबी आणि 128 जीबी रॅम असणाऱ्या या फोनवर मिळणारी ही ऑफर एक जुलैपासून सुरू झाली असून ती चार जुलैपर्यंतच मिळणार आहे. त्यामुळं हा आकर्षक आणि दमदार स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आता उद्याचा दिवसच शिल्लक आहे. त्यामुळं ही संधी हातची जाऊ नये यासाठी ग्राहकांनी त्वरा करणं गरजेचं आहे.

Jio ची भन्नाट सेवा, पेमेंट न करता 5 वेळा करता येईल रिचार्ज, वाचा Emergency Data loan बाबत

रिअलमी 7 प्रो Sun Kissed Leather आवृत्तीत 6.4 इंचाचा आणि 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असून, Sony IMX682 सेन्सर आणि एफ/ 1.8 लेन्स आहे. 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोमसेन्सर आणि एफ/2.4 अपार्चर असणारा 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4500 एमएएचची बॅटरी असून, 65 वॅट सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टीव्हीटीसाठी रिअल मी 7 प्रो मध्ये 4जी, व्होल्टई, वायफाय 802.11 एसी, ब्ल्यूटूथ 5.0, जीपीएस/ ए जीपीएस/ नेव्हिगेशन आणि युएसबी टाईप सी पोर्ट आहे.

Good news: आता Paytm देणार 50 कोटींचा कॅशबॅक, वाचा का घेण्यात आला हा निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?

सध्या 20 हजार रुपये किमतीच्या श्रेणीत येणाऱ्या अनेक स्मार्टफोनमध्ये रिअलमी आघाडीवर असून, हा कंपनीचा या श्रेणीतील लोकप्रिय फोन आहे. याच्या बॅक कव्हरवर सूर्याच्या केशरी रंगाचा थोडासा वापर करण्यात आला आहे. त्यामुळं हा फोन अत्यंत सुंदर दिसतो. दिसायला आकर्षक असणारा हा फोन कार्यक्षमतेतही उत्कृष्ट आहे. आजच्या पिढीला आवडेल असा हा फोन असून अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत. याचा उत्तम कॅमेरा आणि दमदार बॅटरी ही याची खासियत आहे. त्यामुळं नवीन पिढीत अल्पावधीतच हा फोन लोकप्रिय झाला आहे. आता किंमत कमी झाल्यानं हा फोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphones