Home /News /technology /

Stand For Safety : इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची 'स्टँँड फॉर सेफ्टी' मोहीम

Stand For Safety : इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची 'स्टँँड फॉर सेफ्टी' मोहीम

इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची 'स्टँँड फॉर सेफ्टी' मोहीम

इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची 'स्टँँड फॉर सेफ्टी' मोहीम

ट्रोलिंग अशा इतर सर्व प्रकारच्या ऑनलाईन अत्याचारांमध्ये विशेषकरून कोरोनानंतर दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सुरक्षेसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी , बंबलने (Bumble) 'स्टँँड फॉर सेफ्टी' (Stand for safety ) मोहिमेची सुरुवात केली आहे.

पुढे वाचा ...
  सध्याच्या डीजीटल काळात आणि युगात , डीजीटल अ‍ॅप्सचा उदय झाला असून त्याची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळेच अर्थपूर्ण ऑनलाईन संपर्क तयार करणे किंवा नवीन मित्र बनवणे याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. या महामारीमुळे इंटरनेट हा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाल्यामुळे एकमेकांपासून झालेल्या प्रत्यक्ष विलगीकरणानंतरसुद्धा लोकांनी एकमेकांशी ऑनलाईन संपर्क ठेवण्यावर जास्त भर दिल्याचे दिसून आले आहे. मात्र, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत यातील गैरप्रकार , जसे की एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे विद्रुपीकरण करणे, त्यासंबंधी ट्रोलिंग आणि अशा इतर सर्व प्रकारच्या ऑनलाईन अत्याचारांमध्ये विशेषकरून महामारीनंतर दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सुरक्षेसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी , बंबलने 'स्टँँड फॉर सेफ्टी' मोहिमेची सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांच्या समुदायामध्ये डीजीटल सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होईल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या द्वेषपूर्ण कृतींपासून आणि अत्याचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी याची मदत होईल. भारतात घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की सर्वेक्षणातील 50% वापरकर्त्यांना ऑनलाईन द्वेषपूर्ण मजकुराचा सामना करावा लागत आहे. या गोष्टीत भर म्हणून, प्रत्येकी 4 वापरकर्त्या महिलांंमागे 1 महिलेला तिच्या बाह्य रूपाबद्दल नको असलेल्या अशा टिप्पण्यांचा सामना करावा लागला आहे. जास्तकरून, 48% लोकांनी याविषयी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, त्यांच्याविषयी असलेल्या द्वेषपूर्ण ऑनलाईन मजकुराच्या त्रासामुळे आणि अत्याचारामुळे त्यांना इतर लोकांवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे. बंबलची जागरूकता मोहीम यामुळे, बंबलची जागरूकता मोहीम ही भारतातील समुदायाला यामधील होणाऱ्या ऑनलाईन गैरप्रकारांना ओळखून त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी, आणि त्यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी सक्षम बनवण्याचे ध्येय समोर ठेवून कार्य करत आहे. 'स्टँँड फॉर सेफ्टी' ही सुरक्षाविषयक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक मोहीम ही अधिक चांगल्या प्रकारे इंटरनेट सुविधा देण्याबाबतच्या बंबलच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. विनानफा तत्वावर चालणारे सामाजिक संशोधन केंद्र (सीएसआर) आणि स्वतंत्र मुक्त प्रवेशाची डीजीटलचे स्त्रोत असलेली संस्था 'न्याय' यांच्यासोबत केलेल्या भागीदारीनंतर, बंबलने या विषयाशी निगडीत एका सुरक्षा पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे ज्यामुळे त्यांच्या समुदायाला भेडसावणाऱ्या ऑनलाईन द्वेष, अत्याचार आणि भेदभावाविरुद्ध त्यांना सशक्तपणे लढा देता येईल आणि त्यासोबतच समुदायामध्ये डीजीटल सुरक्षेविषयी त्यांना जागरूकता निर्माण करता येईल. ज्या माहितीच्या आधारावर कृती करता येईल अशी या पुस्तिकेतील साधी सोपी माहिती लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी जाणीव करून देईल आणि या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी उपलब्ध पर्यायांविषयी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करेल. आम्हाला या आशयाची सुरक्षा पुस्तिका तयार करण्यासाठी सामाजिक संशोधन आणि न्याय केंद्राशी भागीदारी करताना अत्यंत आनंद होत आहे जे आमच्या समुदायाला योग्य ते सहाय्य करतील आणि त्यांना ऑनलाईन अत्याचार, द्वेष आणि भेदभाव ओळखून त्याविरुद्ध लढा देण्यासाठी अधिक सक्षम करतील. बंबल हे आदर, दयाळूपणा, सर्वसमावेशकता आणि समानता, आणि सुरक्षेच्या मूलभूत मुल्यांवर आधारित असून, ही सर्व मुल्ये पहिल्या दिवसापासूनच बंबलच्या उपक्रमामध्ये केंद्रस्थानी राहिलेली आहेत. बंबलमधील सार्वजनिक धोरण विभागाच्या प्रमुख महिमा कौल यांनी असे स्पष्ट केले आहे की "आमचा 'स्टँँड फॉर सेफ्टी' उपक्रम असे जग निर्माण करण्यासाठी कटीबद्धता दर्शवितो जेथे सर्व नातेसंबंध हे बळकट असतील आणि न्याय्य भूमिका घेणारे असतील." या मताला दुजोरा देत , सामाजिक संशोधन केंद्राच्या मिडीया आणि कम्युनिकेशन्सच्या प्रमुख ज्योती वडेहरा यांनी असे मत व्यक्त केले की,. महिला आणि इतर पिढीत समुदायाच्या दृष्टीने इंटरनेटला अधिक सुरक्षित आणि सुयोग्य होण्यासाठी भारतामधील बंबलसोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. बंबलच्या सुरक्षा पुस्तिकेची निर्मिती ही योग्य दिशेला जाण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असून, याचा उद्देश हा वापरकर्त्यांना अधिकार देणे, आणि ऑनलाईन वापर करताना  त्यांचे राहणीमान अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्यांना लागणारी योग्य ती आयुधे प्रदान करणे आणि त्यांना सक्षम करणे हा आहे." बंबल हे ऑनलाईन पातळीवर सुरक्षित आणि सर्वसमावेशक स्थान मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असते आणि भारताच्या सामाजिक सांस्कृतिक आणि बहु-भाषिक विविधतेला ग्राह्य धरून त्याची मार्गदर्शक तत्वे अद्ययावत करण्यासाठी अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमधील शब्दसंचयामध्ये वृद्धी करून त्या अनुषंगाने कृती करण्याचे उद्धिष्ट साध्य करणार आहे. यासोबतच, सुरक्षेवर भर देणाऱ्या यामधील उत्पादनांच्या वैशिष्ट्यांंमुळे या एपने इतरांपेक्षा स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. जी व्यक्ती बंबल समुदायाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात कृती करेल अशा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वापरकर्ते हे त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकतात आणि त्याचे रिपोर्टिंग करू शकतात. यासोबतच, लोक त्यांच्या समुदायाला सुरक्षित आणि सुयोग्य डेटिंगचा अनुभव मिळवून देण्यासाठी एपमध्ये असलेल्या सेफ्टी + वेलबिंग सेंटर रिसोर्स हबमध्ये प्रवेश करू शकतात. महिलांना वैयक्तिक पातळीवर गोपनीयता राखण्यास मदत भारतातील बंबल समुदायासाठी भौगोलिक-केंद्रित वैशिष्ट्य हे येथील महिलांना वैयक्तिक पातळीवर गोपनीयता राखण्यास मदत करते. कोणत्याही महिलेला तिचे बंबल डेट प्रोफाईल उघडण्याकरिता फक्त पहिले नाव पुरेसे आहे, आणि नंतर तिला या प्रोफाईलविषयी सुरक्षिततेची जाणीव झाल्यानंतर मग ती स्वेच्छेने स्वत:ची इतर माहिती तिच्या संपर्कांसह यावर उघड करू शकते.  प्रायवेट डीटेक्टर, एक असे वैशिष्ट्य आहे जे कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर करून नको असलेले अवांछित नग्न छायाचित्रे शोधून त्यांना अस्पष्ट करण्याचे कार्य करते, जे बंबल वापरकर्त्यांना त्यांची छायाचित्रे ओळखण्यात आणि त्यांना अस्पष्ट करण्यात सहाय्य करतात. बंबल (Bumble) हे अशा काही पहिल्या सोशल नेटवर्किंग एप्सपैकी आहे ज्याने थेट स्पष्टपणे या गैरप्रकारांना विरोध करत एखाद्या व्यक्तीचे दिसणे, त्याच्या शरीराचे आकारमान किंवा आरोग्याशी संबंधित अशा कुठल्याही अवांछित आणि अपमानास्पद टिप्पण्यांवर बंदी घातली आहे. म्हणूनच 'स्टँँड फॉर सेफ्टी' हा उपक्रम बंबलला नक्कीच अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्यास मदत करेल आणि त्यासोबतच इतर डीजीटल प्लॅॅटफॉर्म्सला देखील त्यासारखीच पावले उचलण्यास प्रोत्साहन देईल आणि या ऑनलाईन डेटिंग आणि नेटवर्किंगला एक सुरक्षित ठिकाण बनवण्यास मोलाचे योगदान देईल. अ‍ॅपविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हिटनी वुल्फ हर्ड,  यांनी  महिलांसाठी असलेल्या बंबल नावाच्या -पहिल्या सोशल नेटवर्किंग एपची निर्मिती 2014 साली केली. बंबल हे डेटिंग (बंबल डेट), फ्रेंडशीप (बंबल बीएफएफ) आणि व्यावसाईक नेटवर्किंग मार्फत लोकांना जोडण्याचे कार्य करते (बंबल बिझ्झ). नातेसंबंध कुठल्याही स्वरूपाचे असले, तरीसुद्धा बंबलवर नातेसंबंध जोडण्यात महिला आघाडीवर असतात. बंबल हे समानतेच्या तत्वावर तयार करण्यात आलेले असून आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी नातेसंबंध किती महत्त्वाचे आहेत या संकल्पनेस दुजोरा देणारे आहे. त्यांनी सन्मान, उदारपणा आणि समतेच्या तत्वांवर आपला प्लॅॅटफॉर्म तयार केला असून, त्याचा कार्यरत असलेला समुदाय यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बंबल हे कुठल्याही प्रकारच्या द्वेषाला, अत्याचाराला, किंवा त्रास देण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देत नाही आणि अशी कुठल्याही प्रकारची कृती करणाऱ्या वापरकर्त्यांना अशा कृतीबद्दल जबाबदार धरण्यात येते. बंबल हे एप स्टोर आणि गूगलवर मोफत आणि वैश्विक पातळीवर उपलब्ध आहे. सामाजिक संशोधन केंद्राविषयी (सीएसआर): सामाजिक संशोधन केंद्र (सीएसआर) ही नवी दिल्लीस्थित विना-नफा संस्था असून त्याची स्थापना 1983 साली झाली. सीएसआर हे सामाजिक संशोधन, अहिंसा, लिंग-भेद विरहीत समाज, क्षमता विकास आणि या संपूर्ण संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी कटीबद्ध असते. आमचे ध्येय हे दोन्ही लिंगांच्या चष्म्यातून पहायला गेल्यास सामाजिक विषय समजून घेण्याच्या दृष्टीने योग्य ठरते जेणेकरून आम्ही व्यक्ती, समुदाय आणि संस्थांच्या क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी भक्कम पाया रचू शकतो. न्याय विषयी: न्याय हा एक मुक्त प्रवेश असणारा, डीजीटल रिसोर्स आहे जो आपल्याला साधी  सोपी , सहज कृती करता येईल , तसेच विश्वासार्ह आणि सहज प्रवेश करता येईल अशी कायदेशीर माहिती सर्व भारतीयांना उपलब्ध करून देतो जेणेकरून त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्यास या माहितीचा ते वापर करू शकतील तसेच ते त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक राहतील आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यास या माहितीचा उपयोग होईल. बंबल आणि YouGov यांनी आयोजित केलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार नमुना म्हणून  संपूर्ण भारतातून 2000 प्रौढांना निवडण्यात आले होते
  Published by:Mansi Joshi
  First published:

  Tags: Apps, Internet

  पुढील बातम्या