Home /News /technology /

Block झालेलं WhatsApp Account पुन्हा सुरु करता येणार, महत्त्वाची माहिती समोर

Block झालेलं WhatsApp Account पुन्हा सुरु करता येणार, महत्त्वाची माहिती समोर

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवं फीचर (Feature) आणणार असून, या फीचरच्या माध्यमातून युझर्स त्यांचं ब्लॉक झालेलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनब्लॉक (Unblock) करू शकणार आहेत.

    मुंबई, 1 जुलै : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हा सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप शेअर करू शकता. तसंच यात व्हिडिओ कॉल, ग्रुप कॉलसह अनेक वैविध्यपूर्ण फीचर्स युझर्ससाठी देण्यात आली आहेत. एखाद्या अकाउंटच्या बाबतीत काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास, असं अकाउंट व्हॉट्सअ‍ॅपकडून बंद केलं जातं. दरवर्षी हजारो अकाउंट्स अशा पद्धतीनं ब्लॉक (Block) किंवा बॅन (Ban) होतात. अशा वेळी युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी एक नवीन माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवं फीचर (Feature) आणणार असून, या फीचरच्या माध्यमातून युझर्स त्यांचं ब्लॉक झालेलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनब्लॉक (Unblock) करू शकणार आहेत. परंतु, हे फीचर सर्वसामान्य युझर्ससाठी केव्हा उपलब्ध होईल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट काही कारणांमुळं ब्लॉक करण्यात आलं, तर युझरला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु, आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्सना ब्लॉक किंवा बॅन झालेलं अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी अजून एक संधी देण्याच्या विचारात आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपनं एक नवं फीचर रोलआउट (Rollout) केलं आहे. या फीचरच्या माध्यमातून ज्या युझर्सचं अकाउंट ब्लॉक किंवा बॅन करण्यात आलं आहे, ते त्यांना पुन्हा सुरू करता येईल. सध्या हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर (Beta Version) दिसून आलं आहे. येत्या आठवड्यात हे फीचर आयओएस बीटासाठीदेखील (iOS Beta) जारी केलं जाईल. या फीचरव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टला (Whatsapp Support) ई-मेल करून तुम्ही तुमचं अकाउंट सुरू करण्याची विनंती करू शकता. (आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी) दरम्यान, या फीचरच्या माध्यमातून बॅन किंवा ब्लॉक झालेलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला डिलीट न करता, अधिकृतपणे जुनं अकाउंट पुन्हा सुरू करता येईल. WABetaInfoच्या अहवालानुसार, युझर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर एक ऑप्शन मिळेल. या ऑप्शनच्या माध्यमातून युझर्सना त्यांचं ब्लॉक करण्यात आलेलं अकाउंट पुन्हा सुरू करता येईल. अ‍ॅपवर युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टशी संवाद साधण्यासाठी, तसंच रिव्ह्यूबाबत रिक्वेस्ट टाकण्यासाठी एक ऑप्शन देण्यात येणार आहे. रिक्वेस्ट टाकल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट तुमच्या अकाउंटचं पुनरावलोकन करील. अ‍ॅपचे नियम आणि अटींनुसार, युझर्सच्या अकाउंटवर कोणातीही बेकायदा अ‍ॅक्टिव्हिटी होत नाही ना हे तपासलं जाईल. रिव्ह्यू सबमिट झाल्यानंतर आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत, तर तुमचं अकाउंट पुन्हा सुरू करण्यात येईल. हे फीचर युझर्सना निश्चितच उपयुक्त ठरेल.
    First published:

    Tags: Whatsapp, WhatsApp features

    पुढील बातम्या