WhatsApp वर Deleted मेसेजही वाचता येतात, वापरा 'ही' ट्रिक

WhatsApp वर Deleted मेसेजही वाचता येतात, वापरा 'ही' ट्रिक

Whatsapp वर चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करता येतो. मेसेज डिलीट केला की तो इतर कोणालाही दिसत नाहीत. मात्र असा डिलीट केलेला मेसेजही वाचता येतो.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : जगात सर्वाधिक वापरलं जाणार सोशल मीडिया मेसेजिंग अॅप WhatsApp अनेक फीचर्स युजरना देत असते. सध्या व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांची संख्या जवळपास दोन कोटी इतकी आहे. मेसेज पाठवताना त्यामध्ये टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ याशिवाय डॉक्युमेंटही पाठवता येतात. शिवाय एक फीचर असंही आहे ज्यामुळे चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करता येतो. मेसेज डिलीट केला की तो इतर कोणालाही दिसत नाहीत. मात्र असा डिलीट केलेला मेसेजही वाचता येतो.

व्हॉटसअॅपवर डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक अॅप आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी असलेलं हे अॅप व्हॉटसअॅपवर डिलीट केलेले मेसेज दाखवतं. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या अॅपवर खूपदा जाहिराती येत असल्यानं अडचण होऊ शकते. जाहिरात दिसू नये म्हणून पैसे भरूनही अॅप घेता येऊ शकतं.

तुमच्या फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून WhatsRemoved  हे अॅप डाउनलोड करा. त्यानंतर अॅप तुमच्याकडे काही परमिशन्स मागेल. यामध्ये डेटा, अॅप, नोटिफिकेशन्स यांचा समावेश असेल. त्यानंतर तुम्हाला अशा अॅप्लिकेशन्सची माहिती विचारेल ज्यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला सेव्ह करायची आहेत किंवा अॅप्समध्ये झालेला बदल बघायचा आहे.

तुम्ही अॅप्सची यादी निवडल्यानंतर तुम्हाला Allow म्हणावं लागेल. त्यानंतर अॅपचे सेटिंग पूर्ण होईल आणि वापरता येईल. व्हॉटसअॅपवर येणाऱ्या नोटिफिकेशन्ससोबतच डिलीट केलेले मेसेजही तुम्हाला पाहता येतील. डिलीट मेसेज पाहण्यासाठी तुम्हाला हे अॅप ओपन केल्यानंतर टॉपला Whatsapp वर सिलेक्ट करावं लागेल.

हे वाचा : इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

WhatsRemoved हे थर्ड पार्टी अॅप आहे. यामधून अॅप्सचे नोटिफिकेशन समजतील पण त्याचसोबत तुमच्या मोबाइलवर येणारे ओटीपी आणि इतर महत्वाचे मेसेज अॅप अॅक्सेस करेल. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे वाचा : फोनचं चार्जिंग लवकर संपतं? बॅटरी वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

First published: March 20, 2020, 3:40 PM IST
Tags: whatsapp

ताज्या बातम्या