नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅप स्विगी (Swiggy) , झोमॅटो (Zomato) किंवा कॅब सुविधा देणारी ओला (Ola) सर्विस किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) त्या अॅपच्या सुविधा घेताना आधी ग्राहकाला आपले क्रेडिट कार्ड डिटेल्स द्यावे लागतात. परंतु आता याची गरज भासणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचा एक नवा निमय आणला असून आता कार्ड डिटेल्स देण्याऐवजी केवळ एका टोकन सिस्टमद्वारे काम होणार आहे. रिझर्व्ह बँकेने डिव्हाईस आधारित टोकनायझेशन फ्रेमवर्कचा वापर कार्ड ऑन फाईल टोकनायझेशन (CoFT) सेवांसाठीही सुरू केला आहे.
RBI ने डेटा स्टोरेज संबंधी टोकनायझेशनचे नियम जारी केले आहेत. हे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. CoFT चा नियम मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट वॉच द्वारे केलेल्या पेमेंटवर लागू होणार आहे. आतापर्यंत झोमॅटो सारखे फूड डिलीव्हरी अॅप्स, कॅब सुविधा देणारे अॅप्स, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रहाकांना आपले क्रेडिट कार्ड डिटेल्स भरावे लागतात. हे कार्ड डिटेल्स भरल्यानंतर ते संबंधित अॅप्सवर सेव्ह होतात, त्यामुळे डेटा चोरी सारख्या गोष्टीची भीती असते.
पण आता RBI ने टोकन सर्विस जारी केल्याने हे डिटेल्स द्यावे लागणार नाहीत. टोकन सर्विसमध्ये संपूर्ण डिटेल्सऐवजी केवळ एक टोकन ग्राहकांना दिलं जाईल. ही सर्विस ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल. ही सर्विस वापरण्यासाठी कोणताही दबाव केला जाऊ शकत नाही. तसंच कोणत्याही कंपन्यांकडून ही सर्विस अनिवार्य रुपात लागू केली जाणार नाही. पेमेंट करताना हे टोकन ओळख म्हणून वापरलं जाईल आणि यासाठी ग्राहकांची संमतीही घेतली जाईल.
आता युजर्सचे कार्ड डिटेल्स वेबसाईट किंवा अॅपवर सेव्ह होत असल्याने ते चोरी होण्याची भीती असते. परंतु RBI च्या नव्या नियमामुळे क्रेडिट कार्डने पेमेंट करताना अधिक सुरक्षा मिळेल. डेटा चोरीचा कोणताही धोका असणार नाही. प्रत्येक ट्रान्झेक्शन करताना ग्राहकाला कार्ड डिटेल्स भरण्याची गरज लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.