मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Cyber Fraud झाल्यास 24 तासांत असे मिळतील संपूर्ण पैसे, करावं लागेल हे एक काम

Cyber Fraud झाल्यास 24 तासांत असे मिळतील संपूर्ण पैसे, करावं लागेल हे एक काम

भारत सरकारने हेल्पलाईन नंबर सुरू केला असून, जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असल्यास, संपूर्ण पैसे 24 तासांत अकाउंटमध्ये परत मिळू शकतात.

भारत सरकारने हेल्पलाईन नंबर सुरू केला असून, जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असल्यास, संपूर्ण पैसे 24 तासांत अकाउंटमध्ये परत मिळू शकतात.

भारत सरकारने हेल्पलाईन नंबर सुरू केला असून, जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असल्यास, संपूर्ण पैसे 24 तासांत अकाउंटमध्ये परत मिळू शकतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. परंतु वाढती प्रकरणं पाहता आता भारत सरकारने हेल्पलाईन नंबर सुरू केला असून, जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असल्यास, संपूर्ण पैसे 24 तासांत अकाउंटमध्ये परत मिळू शकतात.

काय आहे सिस्टम -

गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) तयार केलं आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाईटवर एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. 155260 या नंबरवर फ्रॉड झाल्यास कॉल करता येतो.

दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तमिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेशमध्ये 24 तास या नंबरवर कॉल करुन तक्रार दाखल करता येते. इतर राज्यात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत फोनद्वारे तक्रार करता येते.

तक्रार दाखल करताना, फ्रॉडची संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. फ्रॉड कोणत्याही दिवशी, कधी, कोणत्याही वेळी झाला त्याची योग्य माहिती देणं आवश्यक आहे. तसंच व्यक्तीच्या बँकेचं नाव, पत्ता किंवा ज्या ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले त्याची माहिती द्यावी लागेल. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारेच कारवाई केली जाईल आणि पैसे मिळण्यास मदत होईल.

ज्यावेळी तुमचा कॉल 155260 या नंबरवरुन सायबर क्राईम कॉल सेंटरवरमध्ये पोहोचतो, त्यावेळी फ्रॉडबाबतची माहिती रेकॉर्ड केली जाते. त्यानंतर तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ज्या बँक अकाउंटमध्ये पैसे पोहोचले आहेत, ते अकाउंट सायबर क्राईम सेलकडून फ्रीज केलं जातं. म्हणजेच फ्रॉड करणाऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे पोहोचले, तरी तो ते पैसे काढू शकत नाही. तुमच्या तक्रारीची शहानिशा करुन तुमच्या अकाउंटमधून फ्रॉडद्वारे काढण्यात आलेले पैसे पुन्हा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात.

Amazon वर 17 हजारांचा फोन 4 हजारात; अशा ऑफरमध्ये अडकू नका, असा होतोय Online Fraud

महत्त्वाची बाब म्हणजे, फ्रॉड करुन पैसे काढल्याची माहिती मिळताच, जराही वेळ न घालवता त्वरित सायबर हेल्पलाईनमध्ये कॉल करणं गरजेचं आहे. तसंच कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितल्यास, बँकेचे डिटेल्स, ओटीपी मागितल्यास सावध व्हा. तसंच कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.

First published: