नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : केंद्र सरकारद्वारा 2020 साठी 51वा दादा साहेब फाळके पुरस्कारासाठी सुपरस्टार रजनीकांत यांची निवड करण्यात आली. त्यांना हा पुरस्कार मिळणं ही बाब अतिशय खास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा दिवस त्यांच्यासाठी आणखी एका कारणासाठी खास असणार आहे. रविवारी दिल्लीसाठी रवाना झालेल्या रजनीकांत यांनी सांगितलं, की सोमवारचा दिवस माझ्यासाठी दोन विशेष स्थळांसह महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या विशगन एक वॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. हे App लोकांसाठी अतिशय उपयोगी ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
🙏🏻🇮🇳 pic.twitter.com/vkTf6mxYUu
— Rajinikanth (@rajinikanth) October 24, 2021
कसं काम करेल हे App - रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या देशातली पहिलं वॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोमवारी लाँच करणार आहे. या App चं नाव Hoote App असून हे लोकांसाठी अतिशय उपयोगी App ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या App द्वारे लोक आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपले विचार, इच्छा आणि इतर कल्पना शेअर करू शकतात. जसं एखादा व्यक्ती लिखित रुपात ज्याप्रमाणे या गोष्टी व्यक्त करेल, त्याचप्रमाणे ते आपल्या आवाजातून त्यांची मतं, त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात.
Online fraud आणि QR Code फसवणुकीपासून असा करा बचाव, या गोष्टी ठरतील फायदेशीर
रजनीकांत सोमवारी आपल्या आवाजाद्वारे या App चं लाँचिंग करणार आहेत. या App वर हा त्यांचा पहिलाच वॉइस मेसेज असेल. युजर्स App द्वारे 60 सेकंदाचा वॉइस मेसेज पाठवू शकतील. त्याशिवाय याच्या बॅकग्राउंडमध्ये म्युझिक आणि इमेजही लावू शकतात. रजनीकांत आपल्या आवाजात 25 ऑक्टोबर रोजी Hoote App लाँच करतील. हे App काही दिवसांपासून अॅक्टिव्ह आहे. परंतु हे अद्याप पब्लिक करण्यात आलेलं नव्हतं. काही सेलेब्रिटिजच तसंच काही नेते मंडळींचं अकाउंट आधीच या App वर आहे. अभिनेता राणा डुग्गुबती, गौतम गंभीर, पॉप्युलर म्युझिक डायरेक्टर अनिरुद्ध यांच्यासह अनेकांचं या प्लॅटफॉर्मवर अकाउंट आहे.