जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Ola S1 Pro खरेदी करण्यासाठी आता द्यावे लागणार जास्त पैसे; E-Scooter ची किंमत वाढणार

Ola S1 Pro खरेदी करण्यासाठी आता द्यावे लागणार जास्त पैसे; E-Scooter ची किंमत वाढणार

Ola S1 Pro खरेदी करण्यासाठी आता द्यावे लागणार जास्त पैसे; E-Scooter ची किंमत वाढणार

ओला मोबिलिटीने (Ola Mobility) Ola S1 Pro या व्हेरियंटच्या किमतींत वाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जेव्हा विक्रीचा पुढील टप्पा सुरु होईल तेव्हा कंपनी या व्हेरियंटची (Variant) विक्री जास्त किमतीने करणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 19 मार्च : इंधनाचे (Fuel) वाढते दर आणि वाढतं प्रदूषण बघता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसत आहे. सरकारदेखील यासाठी प्रोत्साहन देत आहे. नजीकच्या काळात अनेक वैविध्यपूर्ण फीचर्स असलेल्या ई-स्कूटर (E-Scooter) बाजारात दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवी फीचर्स या ई-स्कूटरमध्ये समाविष्ट केली जात आहेत. ई-स्कूटर उत्पादक कंपनी ओला मोबिलिटीने (Ola Mobility) Ola S1 Pro या व्हेरियंटच्या किमतींत वाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जेव्हा विक्रीचा पुढील टप्पा सुरु होईल तेव्हा कंपनी या व्हेरियंटची (Variant) विक्री जास्त किमतीने करणार आहे. सध्या ओलाच्या या ई-स्कूटरची किंमत 1,29,999 रुपये आहे. अलीकडेच कंपनीने होळीच्या पार्श्वभूमीवर पिवळसर तपकिरी रंगात हा व्हेरियंट सादर केला होता. या रंगाची ई-स्कूटर केवळ 17 आणि 18 मार्च रोजीच खरेदीसाठी उपलब्ध होती. हवा तितका AC वापरुनही येईल कंट्रोलमध्ये वीज बिल, या 4 Tips मुळे होईल पैशांची बचत ओलाने सांगितलं की, ``S1 Pro च्या नवीन ऑर्डर्सचं डिस्पॅच एप्रिल 2022 पासून सुरु होईल आणि ही स्कूटर थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाईल. ओलाने आपल्या स्कूटरबाबत नवे अपडेट्सही जाहीर केले आहेत. या अपडेट्समध्ये मूव्हओएस 2.0 अपडेटसह नवीन फीचर्सही समाविष्ट असतील. त्यामुळे या स्कूटरचा परफॉर्मन्स (Performance) अधिक सुधारेल.`` ओला इलेक्ट्रिक`चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी Ola S1 Pro ई-स्कूटरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील खरेदीबद्दल खरेदीदारांचे आभार मानले आहेत. फूल चार्ज झाल्यावर इतके किलोमीटर धावणार Ola S1 Pro स्कूटरमध्ये 8.5KW ची बॅटरी उपलब्ध आहे. तसेच या स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड (Riding Mode) आहेत. यात नॉर्मल, स्पोर्टस आणि हायपर मोडचा समावेश आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर शून्य ते 40 किमी प्रतितास वेग केवळ 3 सेंकदात गाठते. ही स्कूटर पूर्ण चार्ज (Charge) केल्यावर 130 किमी पर्यंत प्रवास करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. या सोप्या पद्धतीने वाढवू शकता Laptop ची बॅटरी लाइफ, पाहा काय आहे ट्रिक दोन्ही चाकांना दिले आहेत डिस्क ब्रेक Ola S1 Pro स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, टेक मी होम लाईट्सही आहेत. याशिवाय यात रिमोट स्टार्ट व स्टॉप आणि लॉक-अनलॉक सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. फ्रंट आणि रियर साइडला डिस्क ब्रेकसह (Disc Brake) चाकांमध्ये कंबाइन्ड ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरच्या डिक्कीमध्ये 36 लिटर स्पेस उपलब्ध आहे. यात स्पेसमध्ये तुम्ही दोन ओपन फेस हेल्मेट अगदी सहजपणे ठेवू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात