• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • लाखो रुपयांचा iPhone Switch Off किंवा चोरी झाला तरीही करता येणार ट्रॅक, IOS 15 मिळेल हे खास फीचर

लाखो रुपयांचा iPhone Switch Off किंवा चोरी झाला तरीही करता येणार ट्रॅक, IOS 15 मिळेल हे खास फीचर

आता चोरीला गेलेला iPhone शोधण्यासाठीही Apple ने तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यासाठी iPhone युजर्सना लेटेस्ट अपडेट फोनवर इन्स्टॉल करावा लागणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : Apple च्या iPhone ची मोठी पॉप्युलॅरिटी आहे. प्रचंड महाग असले तरी आयफोनची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. Apple iPhone च्या गेल्या तीन वर्षांत लाँच झालेल्या टॉप एंड मॉडेल्सच्या किमती एक लाखाच्या घरात आहेत. एवढा महागडा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर ते नुकसान कोणालाही परवडण्यासारखं नसतंच. पण आता चोरीला गेलेला iPhone शोधण्यासाठीही Apple ने तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यासाठी iPhone युजर्सना लेटेस्ट अपडेट फोनवर इन्स्टॉल करावा लागणार आहे. Apple ने iPhone साठी IOS 15 हा नवा लेटेस्ट अपडेट (Apple Latest Update) उपलब्ध केला आहे. त्याद्वारे आपला iPhone अपडेट करण्यासाठी युजर्सना आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जावं लागेल. तिथे General हा पर्याय सिलेक्ट करावा. त्यानंतर Software Update हा पर्याय निवडून त्यावर टॅप करावं. त्यानंतर आयफोनवर IOS 15 अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. त्यानंतर iPhone अपडेट होईल. Apple ने या Latest Update बद्दलची माहिती आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये दिली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, युजर्सनी Separation Alert अॅक्टिव्हेट केला, तर त्यांना घरात सापडत नसलेला iPhone सापडायला मदत होऊ शकेल. तसंच, या अपडेटमध्ये असे फीचर्स देण्यात आले आहेत, की युजरचा iPhone चोरीला गेल्यानंतर चोराने त्यातला सगळा डेटा डिलीट करून टाकला, तरीही तो ट्रॅक करणं शक्य आहे.

iPhone 13 खरेदीवर 46 हजारांपर्यंतची सूट, Appleची जबरदस्त ऑफर;असा घेता येईल फायदा

iPhone चोरीला जाण्याचं प्रमाण जास्त आहे. सेकंड हँड आयफोनला बऱ्यापैकी किंमत मिळते, हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे iPhone Users ला आपला फोन जपावा लागतो. तरीही तो चोरीला गेलाच, तर आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास या दोन्ही गोष्टी होतात. या अडचणी लक्षात घेऊन IOS 15 हा लेटेस्ट अपडेट कंपनीकडून लाँच करण्यात आला आहे. हा लेटेस्ट अपडेट आयफोनवर इन्स्टॉल केल्यानंतर फोन चोरीला गेला आणि चोरणाऱ्या व्यक्तीने तो फोन स्विच ऑफ केला, तरीही iPhone ट्रॅक करता येतो. युजरकडून iPhone कुठे हरवला किंवा कुठे ठेवलाय ते आठवत नसेल, तरीही तो शोधण्यास या फीचरचा उपयोग होऊ शकतो.

iPhone 13 सीरिजसाठी प्री-बुकिंग सुरू, असा मिळेल डिस्काउंट

यासाठी iPhone युजर्सना फाइंड माय नेटवर्क (Find My Network) हे फीचर एनेबल करावं लागेल. हे फीचर बाय डिफॉल्ट सुरूच असतं, मात्र तरीही ते चुकून बंद झालेलं नाही ना, याची खात्री करून घ्यावी. iPhone स्विचऑफ झाल्यानंतर 24 तासांपर्यंत तो ट्रॅक करणं या फीचरच्या साहाय्याने शक्य आहे, असं Apple कंपनीने म्हटलं आहे.
First published: