नवी दिल्ली, 25 मे : फॅशन आणि ट्रेंडच्या नावावर अनेक मोठ्या, लक्झरी ब्रँड्सने लोकांची लूट केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. कधी फाटलेलं स्वेटर, तर कधी भंगाराप्रमाणे दिसणारा शूज यासारख्या अनेक गोष्टी मोठ्या किमतीत विक्रीसाठी ठेवल्याचं समोर आहे. आता फॅशननंतर Amazon सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइटनेही लोकांची लूट केल्याचं चित्र आहे. सध्या Amazon वर असलेल्या एका प्लास्टिकच्या बादलीची चर्चा आहे. ही साधी बादली इतकी चर्चेत का आहे, याचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. ही बादली बाजारात मिळणाऱ्या 200-300 रुपयांच्या बादलीसारखीच दिसते. पण Amazon ने याची किंमत हजारो रुपये लावली आहे. लोकांची हीच बाब पटत नाहीये. गुलाबी रंगाच्या साध्या प्लास्टिकच्या बादलीची किंमत Amazon ने 26000 रुपये लावली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ही बादली या इतक्या मोठी किमतीत विकलीही जात आहे. 28 टक्के डिस्काउंटनंतर 26000 रुपये किंमत - तुम्हाला विश्वास बसणार नाही पण Amazon वर या बादलीची किंमत 35,900 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यावर 28 टक्के डिस्काउंट लावल्यानंतर याची किंमत 25,900 रुपये इतकी आहे. आधी अनेकांनी या बादलीची किंमत चुकून चुकीची लिहिली गेली असावी असं वाटलं. पण ही बादली 26000 रुपयांनी विकली गेली असल्याचं समजल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे. एका ट्विटर युजरने याचा फोटो आणि किंमत सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही किंमत ऐकून धक्का बसल्याचं म्हटलंय. तर काहींनी मजेशीर कमेंट करत आता यासाठी किडनी विकावी लागेल असं म्हटलं आहे.
Just found this on Amazon and I don't know what to do pic.twitter.com/hvxTqGYzC4
— Vivek Raju (@vivekraju93) May 23, 2022
इतक्या साध्या वस्तूची किंमत इतकी मोठी ठेवल्याची Amazon ची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही Amazon वर साध्या गोष्टींसाठी अशा प्रकारे भरमसाठ किमती ठेवल्याचं समोर आलं आहे. लहान मुलांना मारण्यासाठी वापरली जाणारी बांबूची छडी 400-500 रुपयांत विकली होती. तर अमेरिकन कंपनी Amazon ने कडुलिंबाच्या झाडापासून बनवण्यात आलेला ऑर्गेनिक टूथब्रश सांगत लोकांना 1800 रुपयांचा चुना लावला होता.