मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जेलमध्ये सुरू केला 'बिजनेस'; Paytm वर पेमेंट अणि थेट तुरुंगात डिलिव्हरी

जेलमध्ये सुरू केला 'बिजनेस'; Paytm वर पेमेंट अणि थेट तुरुंगात डिलिव्हरी

तुरुंगातील कैद्यांना (Prisoner) बेकायदेशीरपणे बाहेरील सामान पोहचवलं जात होतं. मोबाईल फोनवर सामानाची लिस्ट घेतली जात होती आणि सामानाचं पेमेंट ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमवरून (Paytm) केलं जात होतं.

नवी दिल्ली, 24 जून: तुरुंगातील कैद्यांना (Prisoner) बेकायदेशीरपणे बाहेरील सामान पोहचवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल फोनवर सामानाची लिस्ट घेतली जात होती आणि सामानाचं पेमेंट ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमवरून (Paytm) केलं जात होतं. एवढचं नाही, तर हे सामान बाजारी दरापेक्षा अधिकच्या किमतीत पुरवलं जात होतं. जेल प्रशासनाच्या तपासात याचा खुलासा झाला आहे.

गौतम नगर लुक्सर जेलमध्ये (Luksar Jail) हा प्रकार उघडकीस आला. जेलपासून काही अंतरावर एक किराणा दुकानातील (Kirana Store) मालक हे बेकायदेशीर रॅकेट चालवत होता. जेल अधिकाऱ्यांनी किराणा स्टोर मालकाविरोधात ईकोटेक ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केली आहे.

असा समोर आला प्रकार -

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा दुकानाच्या मालकाचा मुलगा नुकताच एका केसमध्ये काही दिवसांसाठी जेलमध्ये होता. त्याचदरम्यान त्याने जेलच्या काही कर्मचाऱ्यांसह मिळून हा प्लॅन केला, की जेलमध्ये बंद कैद्यांचे कुटुंबिय हव्या त्या सामानासाठी पेटीएमवरून पेमेंट करतील आणि ते कैद्यांपर्यंत जेलमध्ये पोहोचवलं जाईल. यासाठी मनमानी हवे तितके पैसे वसूल केले जात होते.

(वाचा - 25 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; होईल 50 हजारपर्यंत कमाई)

परंतु काही कैद्यांनी तक्रार केली, की त्यांच्या कुटुंबियांकडून या दुकानदाराने मोठी रक्कम तर घेतली, पण त्यानंतर जेलमध्ये त्यांना सामान देण्यात आलं नाही. पुरावा म्हणून कैद्यांनी जेल अधिकाऱ्यांना पेटीएम पेमेंटची (Paytm Payment) रिसीट दाखवली. याच पेटीएम रिसीटवरुन जेल अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

(वाचा - Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर)

फसवणुकीअंतर्गत तक्रार दाखल -

जेल प्रशासनाने किराणा दुकानाच्या मालकाविरोधात फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानाच्या मालकासह जेलमधील काही जेल कर्मचारीही यात सामिल असल्याचा संशय जेल अधिकाऱ्यांना आहे.

दरम्यान, यापूर्वी जेल प्रशासनाने जेलमध्ये पाठवण्याच्या प्रयत्नात असलेला चरसही जप्त केला होता.

First published:

Tags: Paytm