Home /News /technology /

मोठ्या ब्रेकनंतर देशात विविध ठिकाणी सुरू होत आहेत सिनेमागृहं, Paytmकडून मिळतील या खास सुविधा

मोठ्या ब्रेकनंतर देशात विविध ठिकाणी सुरू होत आहेत सिनेमागृहं, Paytmकडून मिळतील या खास सुविधा

देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएमने (Paytm) गुरूवारी, चित्रपटगृहात येणाऱ्यांना ते एक डिजिटल, कॉन्टॅक्टलेस आणि सुरक्षित अनुभव देणार असल्याचं सांगत, काही ऑफर्सची घोषण केली आहे.

  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद केलेले सिनेमागृह (Cinema Halls) पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात अद्याप थिएटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यादरम्यान, देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएमने (Paytm) गुरूवारी, चित्रपटगृहात येणाऱ्यांना ते एक डिजिटल, कॉन्टॅक्टलेस आणि सुरक्षित अनुभव देणार असल्याचं सांगत, काही ऑफर्सची घोषण केली आहे. पेटीएमने पीव्हीआर सिनेमासह (PVR Cinemas) करार केला असून, एका तिकीटावर एक फ्री मू्व्ही तिकीट देण्याचं सांगितलं आहे. ही ऑफर लिमिटेड काळासाठी आहे. तसंच कंपनीकडून Mini App Storeचा वापर करण्याबाबतही सांगण्यात आलं आहे. मिनि ऍप स्टोरचा उपयोग कॅब बुक करण्यासाठी किंवा टू-व्हीलर भाडे तत्त्वावर घेण्यासाठी केला जाऊ शकतो. फूड काउंटरवर पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्डचा वापर करून सामान खरेदी करता येऊ शकतं. वाचा - फूड अँड पॅकेजिंग हल्दीरामवर सायबर हल्ला; हॅकर्सकडून लाखोंची मागणी ऍपवर सोशल डिस्टंस सीट लेआऊटची माहिती - पेटीएम ऍप आणि वेबसाईटवर सोशल डिस्टंस सीट लेआऊट दाखवण्यात येत आहे. त्याशिवाय सिनेमागृहात थर्मल स्क्रिनिंग, कॉन्टॅक्टलेस सुरक्षा चौकशी, हँड सॅनिटायझर आणि स्टाफसाठी रोजच्या टेंपरेचर चेकची माहिती दिली जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रेकक्षकांना बॉक्स-ऑफिस, एन्ट्री गेट, फूड काउंटवरही लाईन लावावी लागणार नाही. वाचा - Paytm मधून पैसे कट, पण ट्रान्झेक्शन फेल; डोंट वरी असे मिळतील संपूर्ण पैसे पेटीएम प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य स्थिती आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बाउंसबॅक करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सिनेमा हॉल पुन्हा सुरू केल्यामुळे लाखो मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन कर्मचाऱ्यांना पुन्हा काम मिळणार आहे. प्रेक्षकांना सुरक्षित अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं.

  वाचा - आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Paytm offers

  पुढील बातम्या