मुंबई, 16 ऑक्टोबर : वीज बिल भरण्यासाठी अनेक जण ई-वॉलेट कंपनी पेटीएमचा (Paytm) वापर करतात. अनेकदा वीज बिल भरल्यानंतर ट्रान्झेक्शन फेल होतं, पण पैसे अकाउंटमधून कट झाल्याचा मेसेज येतो.
असं का होतं -
- ज्यावेळी पेटीएम किंवा कोणतंही ई-वॉलेट, तुमच्या बँक किंवा गेटवेकडून फायनल कन्फर्मेशन प्राप्त करत नाही, त्यावेळी ट्रान्झेक्शन पेंडिंग होतं. काही तासांनंतरही कन्फर्मेशन न मिळाल्यास, ट्रान्झेक्शन फेल होतं.
- पेमेंट गेटवेमध्ये तांत्रिक समस्या आल्यास
- पेमेंट करताना इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचण आल्यास, अशी समस्या येते.
अकाउंटमधून पैसे कट झाले, पण ट्रान्झेक्शन फेल झाल्यास काय कराल?
Paytm App -
पेटीएम ऍपवर सर्वात वर असलेल्या डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर 24*7 Help and Support मध्ये जा. त्यानंतर Get help with recent order द्वारे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर Order सिलेक्ट करा. त्यानंतर तक्रार दाखल करा. पुन्हा 24*7 Help and Support मध्ये सर्वात वर Your Recent Tickets दिसेल. संबंधित Ticketsवर क्लिक करून आपल्या तक्रारीचं स्टेटस जाणून घेता येईल.
हे वाचा - आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...
कस्टमर केयर -
पेटीएमसह सर्वच ई-वॉलेट कंपन्या ग्राहकांना कस्टमर केयर सुविधा देतात. पेटीएमच्या कस्टमर केयर नंबरवर (बँक, वॉलेट आणि पेमेंटसाठी - 0120-4456456) कॉल करा, त्यानंतर एग्जिक्यूटिव्ह ट्रान्जेक्शन आयडी किंवा ऑर्डर आयडी मागेल. त्यानंतर तक्रार दाखल होऊन एक कंप्लेन नंबर दिला जाईल.
The Ombudsman Scheme for Digital Transactions -
आरबीआयने डिजिटल पेमेंट करणाऱ्या कस्टमर्सना मोठी सुविधा दिली आहे. आता ई-वॉलेट आणि इतर डिजिटल पेमेंटची सेवा देणाऱ्या कंपन्यांची तक्रार थेट Ombudsman कडे करता येणार आहे. डिजिटल पेमेंट कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, देशभरात 21 Ombudsman ऑफिसमध्ये तक्रार दाखल करता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm Money