जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / PAN कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य; अशी करा online process

PAN कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य; अशी करा online process

PAN कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य; अशी करा online process

मुदतीच्या आत भारतीय नागरिकांना पॅन कार्ड (Pan Card) आधारकार्ड (Aadhar) लिंक करणं अनिवार्य असल्याचं जाहीर केलं आहे. मुदतीच्या आता हे लिकिंग न केल्यास आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर करता येणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 मार्च : भारत सरकारने पॅन कार्ड (Pan Card) आधारकार्ड (Aadhaar) लिंक करणं अनिवार्य केलं असून, त्यासाठी 31 मार्च 2021 ही अंतिम मुदत आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आधार आणि पॅन लिंक करणं बंधनकारक आहे. अन्यथा दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसंच पॅन कार्ड निष्क्रीयही होऊ शकतं. मुदतीच्या आत भारतीय नागरिकांना पॅन कार्ड (Pan Card) आधारकार्ड (Aadhaar) लिंक करणं अनिवार्य असल्याचं जाहीर केलं आहे. मुदतीच्या आता हे लिकिंग न केल्यास आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. बँकेत खातं उघडण्यासारखी आर्थिक व्यवहारांशी संबधित कामांसाठी पॅन कार्डचा उपयोग होणार नाही. तसंच गॅस अनुदान, शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन आदी सरकारी लाभही मिळणार नाहीत. अदयाप तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल, तर खालील दोन प्रकारे तुम्ही हे काम करू शकता. पॅन कार्ड -आधार ऑनलाईन लिंक - - ऑनलाइन तपशील भरण्यासाठी सर्वात आधी आपलं पॅन आणि आधार कार्ड आपल्यासमोर ठेवा. - इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा ( www.incometaxindiaefiling.gov.in  या लिंकवर जा) - क्विक लिंक्स सेक्शनमध्ये डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार (Link Aadhaar) यावर क्लिक करा.

    (वाचा -  फोन पाण्यात पडल्यानंतर या गोष्टी करू नका; वॉटर डॅमेजपासून वाचण्यासाठी Magic Tips )

    - तुम्ही एका नवीन पेजवर जाल. - इथे तुमचा पॅन,आधार क्रमांक आणि आधार कार्डप्रमाणे आपलं नाव इत्यादी आवश्यक माहिती भरा. - तुमच्या जन्माच्या वर्षाचा उल्लेख तुमच्या आधार कार्डमध्ये असेल तरच बॉक्सवर टिक करा. - आपली सहमती विचारणाऱ्या बॉक्सवर क्लिक करा. - आपल्या स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा. (दृष्टीहीन व्यक्ती कॅप्चा कोड ऐवजी वन-टाईम पासवर्ड किंवा ओटीपीसाठी विनंती करू शकतात. आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल) - ‘लिंक आधार’ या बटणावर क्लिक करा आणि रिक्वेस्ट सबमिट करा. पॅन-आधार मोबाईल फोनद्वारे लिंक करण्यासाठी - - आपण 567678 किंवा 56161 वर UIDPAN<12digit Aadhaar><10-digit PAN> या विहित नमुन्यानुसार एसएमएस पाठवू शकता. (उदाहरणार्थ, आपला आधार क्रमांक 108956743120 असेल आणि तुमचा पॅन ABCD1234F  असा असेल तर UIDAI स्पेस 108956743120 ABCD1234F टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर पाठवा.) - तुमचं पॅन-आधार लिंक झाल्यावर तुम्हाला त्याची सूचना मिळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात