मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Oppo च्या या 5G स्मार्टफोनची विक्री सुरू, जाणून घ्या या फोनची खरेदी का आहे बेस्ट डील?

Oppo च्या या 5G स्मार्टफोनची विक्री सुरू, जाणून घ्या या फोनची खरेदी का आहे बेस्ट डील?

Oppo Reno 7 5G या स्मार्टफोनची (Smartphone) विक्री सुरू झाली आहे. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदी करू शकता. हा 5G स्मार्टफोन तुम्ही ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरूनही खरेदी करू शकता.

Oppo Reno 7 5G या स्मार्टफोनची (Smartphone) विक्री सुरू झाली आहे. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदी करू शकता. हा 5G स्मार्टफोन तुम्ही ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरूनही खरेदी करू शकता.

Oppo Reno 7 5G या स्मार्टफोनची (Smartphone) विक्री सुरू झाली आहे. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदी करू शकता. हा 5G स्मार्टफोन तुम्ही ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरूनही खरेदी करू शकता.

  नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: Oppo Reno 7 5G या स्मार्टफोनची (Smartphone) विक्री सुरू झाली आहे. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदी करू शकता. ओप्पोच्या या स्मार्टफोन खरेदीवर कंपनी काही शानदार ऑफर्सही (Offers) देत आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या खरेदीवर, तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक आणि 3000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. ओप्पोच्या Reno 7 सीरिजमधले स्मार्टफोन भारतात 4 फेब्रुवारीला लॉंच करण्यात आले. कंपनीने रेनो 7 सीरिज अंतर्गत Oppo Reno 7 5G आणि Oppo Reno 7 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लॉंच केले होते.

  ओप्पो रेनो 7 5G मध्ये 6.4 इंचाचा फूल -एचडी+एमोलेड डिस्प्ले (Full HD+AMOLED Display) देण्यात आला आहे. यात 90 Hzचा रिफ्रेश रेट आणि 180 Hz पर्यंत टच सॅपलिंग रेट आहे. ओप्पोचा हा नवा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्शन 900 SoC (Mediatek Dimensity) द्वारे ऑपरेट होतो. ओप्पो रेनो 7 स्मार्टफोनमध्ये 'सोनी आयएमएक्स 709' सेन्सर देण्यात आला आहे. सोनी आयएमएक्स 709 अल्ट्रा सेन्सर हा मोबाईल फोनमध्ये वापरला जाणारा जगातील पहिला सेन्सर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन लाइट ऑर्बिट ब्रीथिंग लाइट असेल. स्मार्टफोनवर मेसेज येताच ही लाइट युजर्सला अलर्ट करेल.

  हे वाचा-WhatsApp Update: व्हॉईस मेसेजमध्ये दिसणार असा बदल,वाचा कुणाला मिळणार हे नवं फीचर

  Oppo Reno 7 5G च्या खरेदीवर उत्तम ऑफर

  8GB RAM +256 GB स्टोरेज असलेल्या Oppo Reno 7 5G व्हॅरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. हा फोन एकाच व्हॅरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. हा फोन Starry Black आणि Startrails Blue अशा दोन रंगांच्या पर्यायासह सादर करण्यात आला आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू आहे. फ्लिपकार्टने हा फोन नो-कॉस्ट ईएमआयसह (No Cost EMI) विक्रीसाठी सादर केला आहे. हा ओप्पो स्मार्टफोन 4,834 रुपयांच्या सुलभ अशा ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. अ‍ॅक्सिस बॅंक, बॅंक ऑफ बडोदा आणि स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेच्या कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के सूट ग्राहकांना मिळणार आहे.

  हे वाचा-याठिकाणी WhatsApp वर अशी इमोजी पाठवली तर थेट तुरुंगवारी! होऊ शकतो 20 लाखांचा दंड

  ओप्पोच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार स्मार्टफोन

  Oppo Reno 7 5G स्मार्टफोन तुम्ही ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरूनही खरेदी करू शकता. येथे तुम्ही अ‍ॅक्सिस बॅंक, बॅंक ऑफ बडोदा आणि स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक आणि येस बॅंकेच्या कार्डाद्वारे फोन खरेदी केला तर तर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. हा फोन बजाज फिनसर्व्हकडून सहा महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येणार आहे. Oppo Reno 7 5G हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यासोबत एक 30W ची पॉवर बँक (Power bank) मोफत दिली जात आहे.

  First published:

  Tags: Flipkart, Oppo, Oppo smartphone