मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp Update: व्हॉईस मेसेजमध्ये दिसणार असा बदल, वाचा कुणाला मिळणार हे नवं फीचर

WhatsApp Update: व्हॉईस मेसेजमध्ये दिसणार असा बदल, वाचा कुणाला मिळणार हे नवं फीचर

QR Code सह WhatsApp Account वेरिफाय करा. डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर Settings वर क्लिक करा.

QR Code सह WhatsApp Account वेरिफाय करा. डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर Settings वर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅपने iPhone आणि iPad सहित iOS यूजर्ससाठी वेगळ्या चॅटमध्ये व्हॉईस मेसेज पाठवण्याची सुविधा दिली आहे. यामुळे युजर्स हे चॅट विंडोच्या बाहेर व्हॉईस मेसेज आणि ऑडिओ फाइल प्ले करू शकतात.

    मुंबई, 17 फेब्रुवारी: जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी लोक एकमेंकाशी जोडले गेले आहेत. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत चॅट करण्यासाठी आणि ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पाहायला मिळते. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी आपले व्हर्जन अपडेट केले जाते आणि विविध फीचर लाँच केली जातात. व्हॉट्सअ‍ॅपने एक नवे व्हॉईस फीचर आणले आहे.

    व्हॉट्सअ‍ॅपने iPhone आणि iPad सहित iOS यूजर्ससाठी वेगळ्या चॅटमध्ये व्हॉईस मेसेज पाठवण्याची सुविधा दिली आहे. यामुळे युजर्स हे चॅट विंडोच्या बाहेर व्हॉईस मेसेज आणि ऑडिओ फाइल प्ले करू शकतात. हे फीचर सध्या फक्त Apple यूजर्ससाठी आहे. लवकरच हे अपडेट Android युजर्ससाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    हे वाचा-वडिलांचं स्टेशनरी दुकान,मुलगा बनला करोडपती! Google ने या कारणामुळे दिले 65 कोटी

    व्हॉट्सअ‍ॅप अनेक प्लॅटफॉर्मवर आपल्या व्हॉईस नोट सुधारण्यासाठी काम करत आहे. डेस्कटॉपवरही ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेयरची सुविधा व्हॉट्सअ‍ॅप देत आहे. व्हॉट्सअ‍ॅप नव-नवीन प्रयोग करत असते आणि युजरच्या सुरक्षेची काळजी घेते. आता ही नवा व्हॉईस मेसेजची सुविधा या वर्षात युजर्संना मिळणार आहे.

    नवीन ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेयर फक्त iOS वर उपलब्ध करण्यात आला आहे. IOS v22.4.75 वर युजर्स चॅटच्या बाहेर व्हॉईस मेसेज आणि ऑडिओ फाइल्स प्ले करू शकतील. यामुळे युजर्स हे एका चॅट विंडोमध्ये मेसेज पाठवताना दुसऱ्या चॅटमधील व्हॉईस नोट ऐकू शकतील.

    हे वाचा-लहान मुलांना Bike वरुन घेऊन जाता? आता हे नियम न पाळल्यास भरावा लागेल दंड

    मेटाच्या (Meta) मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही काळापासून व्हॉईस मेसेजवर काम करत होतं. बीटा टेस्टरसाठी हे जारी केले होते. तेव्हा पहिल्यांदा iOS वर पाहायला मिळालं होतं. बीटा चाचणीच्या स्क्रीनशॉटमध्ये Apple वरील व्हॉईस मेसेज प्लेअरचा लेआउट दिसतो. मेसेज पाठवणार्‍या युजरच्या नावासह प्लेयर स्क्रीनवर व्हॉईस मेसेज दिसतो. याशिवाय, व्हॉईस मेसेज प्ले आणि पॉज करण्याचा पर्यायदेखील यात आहे.

    याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप कॅमेरा आयकॉनमध्ये अनेक बदल होणार आहेत. गॅलरीत रीसेंट पिक्‍चर्ससाठी हॉरिझाँटल बार स्क्रिनच्या बॉटममध्ये दिसेल. तसेच सध्या जो हॉरिझाँटल मीडिया बार आहे. तो नव्या बटनात बदलेल. यातून लगेचच गॅलरी उघडेल. व्हॉट्सअ‍ॅप कॅमेऱ्यातील (WhatsApp Camera) इतर बदल येत्या अपडेट्समध्ये उपलब्ध होतील. WhatsApp वर नेहमीच एकापेक्षा एक मस्त फीचर्स अपडेट होत असतात. ज्यामुळे युजर्सना चॅट्सचा अधिक चांगला आनंद अनुभवता येतो.

    First published:

    Tags: Whatsaap, Whatsapp chat, WhatsApp features