नवी दिल्ली, 19 डिसेंबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) काही दिवसांपूर्वी नवा स्मार्टफोन ओप्पो रेनो 5 (Oppo Reno 5) आणि ओप्पो रेनो 5 प्रो (Oppo Reno 5 Pro) चीनमध्ये लाँच केला होता. या फोनचा पहिला सेल चीनमध्ये 18 डिसेंबर रोजी होता. या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या फोनच्या पॉप्युलॅरिटीबद्दल कंपनीने अधिकृत डेटा जारी केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सेल सुरू झाल्याच्या केवळ 10 मिनिटांमध्ये reno 5 seris ने 100 मिनियन युआन म्हणजेच जवळपास 112 कोटी रुपयांची विक्री केली आहे. याबाबत
गिजमोचायनावर छापण्यात आलेल्या रिपोर्टद्वारे मिळाली आहे.
Oppo Reno 5 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या मॉलेडची किंमत 2,699 युआन म्हणजेच जवळपास 30,300 रुपये इतकी आहे. तर, या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2,999 युआन, जवळपास 33,700 रुपये आहे.
Oppo Reno 5 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत 38,180 रुपये आहे. तर या मॉडेलच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,700 रुपये इतकी आहे.
Oppo Reno 5 सीरीजमध्ये, Oppo Reno 5 फोनला 6.43 इंची फुल HD+ OLED डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. तर Oppo Reno 5 Pro वेरिएंटमध्ये 6.55 इंची OLED डिस्प्ले, मीडियाटेक Dimensity 1000+ चिपसेट आहे. Oppo च्या या दोन्ही फोनला अँड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
दोन्ही फोनला 4 रियर कॅमेरा -
Oppo Reno 5 Pro आणि Oppo Reno 5 स्मार्टफोनला रियल क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तर 8MP + 2MP + 2MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
दोन्ही फोनला 32 मेगापिक्सल फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. Oppo Reno 5 मध्ये 4,300 mAh बॅटरी, तर Oppo Reno 5 Pro मध्ये 4,350 mAh बॅटरी आहे. दोन्ही फोनची बॅटरी 5W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.