मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली लावला लाखो रुपयांचा चुना; आरोपी गजाआड

मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली लावला लाखो रुपयांचा चुना; आरोपी गजाआड

आरोपीेने, कंपनीला टॉवर लावायचा आहे आणि त्यासाठी जागा हवी असल्याचं सांगत कॉल केला. एवढंच नाही तर, कंपनी जागेच्या बदल्यात 20 लाख रुपये देईल आणि त्याशिवाय नोकरीही देणार असल्याचं सांगितलं.

आरोपीेने, कंपनीला टॉवर लावायचा आहे आणि त्यासाठी जागा हवी असल्याचं सांगत कॉल केला. एवढंच नाही तर, कंपनी जागेच्या बदल्यात 20 लाख रुपये देईल आणि त्याशिवाय नोकरीही देणार असल्याचं सांगितलं.

आरोपीेने, कंपनीला टॉवर लावायचा आहे आणि त्यासाठी जागा हवी असल्याचं सांगत कॉल केला. एवढंच नाही तर, कंपनी जागेच्या बदल्यात 20 लाख रुपये देईल आणि त्याशिवाय नोकरीही देणार असल्याचं सांगितलं.

शिमला, 19 डिसेंबर : कोरोना काळात डिजिटल व्यवहारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन-डिजिटल व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, दुसरीकडे ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही वेगात वाढत आहे. नुकताच ऑनलाईन फसवणूकीचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट 2019 मध्ये एका व्यक्तीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या व्यक्तीला 4 जुलै 2019 रोजी एक कॉल आला होता. त्या कॉलवर फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने तो एका खासगी कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगत, मोबाईल टॉवर लावायचा असल्याचं सांगितलं. परंतु सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे, कोणतीही टेलिकॉम कंपनी टॉवर लावण्यासाठी अशाप्रकारे कॉल करत नाही.

(वाचा - आधी 3 मिनिटांत एक इनोवा बनत होती, आता 2.5 मिनिटांचं टार्गेट; कर्मचारी संपावर)

हे संपूर्ण प्रकरण हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील आहे. आरोपीने दियार गावात कंपनीला टॉवर लावायचा आहे आणि त्यासाठी जागा हवी असल्याचं सांगत कॉल केला. एवढंच नाही तर, कंपनी जागेच्या बदल्यात 20 लाख रुपये देईल आणि त्याशिवाय नोकरीही देणार असल्याचं सांगितलं. त्यापूर्वी आरोपीने पीडित व्यक्तीला 19,500 रुपये खात्यात जमा करण्याचं सांगितलं आणि त्या पीडित व्यक्तीने पैसे सांगितल्याप्रमाणे खात्यात जमाही केले. त्यानंतर सतत आरोपीने त्यांच्याकडून टॉवर लावण्याच्या नावाखाली तब्बल 5 लाख रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले.

(वाचा - Mobile App डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट)

त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केली. SIT ने (विशेष तपास पथक) बंगालमधून फसवणूक करणाऱ्या 51 वर्षीय व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला अटक केली असून ट्रांजिट रिमांडवर त्या दोघांना कुल्लूमध्ये आणण्यात आलं आहे.

(वाचा - रिटायर्ड अधिकाऱ्याच्या खात्यातून 40 लाखांची चोरी; थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार)

आरोपीने, फसवणूक केलेल्या व्यक्तीचे पैसे एका फेक अकाउंटमध्ये जमा केले होते. आरोपीकडून 2 चेकबुक, 2 सिम कार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विशेष तपास पथकातील सदस्यांनी (SIT) अशाप्रकारच्या वेगवेगळ्या फ्रॉड, फसवणूकीच्या प्रकरणात 11 आरोपींना बिहार, झारखंड, वेस्ट बंगालमधून अटक केली आहे.

First published:
top videos