मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Crime Alert! अनोळखी कॉल्सपासून सावधान; अन्यथा दिवाळीत होऊ शकतो बँक अकाऊंट रिकामा

Crime Alert! अनोळखी कॉल्सपासून सावधान; अन्यथा दिवाळीत होऊ शकतो बँक अकाऊंट रिकामा

आजकाल सतत ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds) बातम्या आपण वाचत असतो. डिजिटल व्यवहारांचे (Digital Transactions) प्रमाण वाढल्यानं ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाणही वाढलं आहे.

आजकाल सतत ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds) बातम्या आपण वाचत असतो. डिजिटल व्यवहारांचे (Digital Transactions) प्रमाण वाढल्यानं ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाणही वाढलं आहे.

आजकाल सतत ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds) बातम्या आपण वाचत असतो. डिजिटल व्यवहारांचे (Digital Transactions) प्रमाण वाढल्यानं ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाणही वाढलं आहे.

मुंबई,19ऑक्टोबर-  आजकाल सतत ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds) बातम्या आपण वाचत असतो. डिजिटल व्यवहारांचे (Digital Transactions) प्रमाण वाढल्यानं ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाणही वाढलं आहे. मोबाईलवरून (Mobile) आता ऑनलाइन आर्थिक व्यवहार केले जातात. आपला मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याला जोडलेला असतो. तसंच वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जातात. त्यामुळे फोन करून बँक डिटेल्स जाणून घेणं, लिंक पाठवून बँक डिटेल्स हॅक करून खात्यातील पैसे काढून घेण्यासारखे प्रकार वाढले आहेत. असे गुन्हे करणारे सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे याबाबत विविध स्तरावर जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टीव्हीवर, सोशल मीडियावर, मुद्रित माध्यमांच्या सहायाने मोबाइलच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते याबाबत जागृती केली जाते. तरीही अशा फसवणूकीला बळी पडण्याचे प्रकार घडतच आहेत. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत नुकत्याच घडलेल्या घटनेनं ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे अशा गुन्ह्यांमध्ये सावज बनवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपी एक्स्टेंशन परिसरात राहणारे खासगी कंपनीतून निवृत्त झालेले गोपाल कृष्ण अय्यर यांना गेल्या आठवड्यात संध्याकाळी एक फोन आला. बँकेतून एक वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून अय्यर यांच्या खात्याची सर्व माहिती त्या व्यक्तीने मिळवली. त्यानंतर अय्यर यांच्या मोबाईलवर पैसे हस्तांतरित करण्यासाठी आलेला ओटीपीही जाणून घेतला. अय्यर यांनी ओटीपी (OTP) सांगताच त्यांच्या खात्यातून 12 लाख रुपये त्या गुन्हेगारांनी आपल्या बँक खात्यात हस्तांतरित केले. अवघ्या अर्ध्या तासात 12 लाख रुपयांची रक्कम अय्यर यांच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आली. नंतर बँकेकडून आलेल्या ईमेलमुळे अय्यर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (हे वाचा:नव्या Smartphone मध्ये असा ट्रान्सफर करा WhatsApp Data, जाणून घ्या सोपी पद्धत) याबाबत बँक अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना ही रक्कम गोठवण्याची विनंती केली,पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अय्यर यांनी याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली; पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर, त्यांनी अनेक ठिकाणी लेखी तक्रार दिली, तेव्हा त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता पोलिसांची सायबर सेल टीम (Cyber Cell Team) याचा तपास करत आहे. (हे वाचा:सावधान! गाडीचं स्टेअरिंग फेल होण्याआधी मिळतात हे 5 संकेत,या गोष्टींकडे लक्ष द्या) या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोन कॉल्सबाबत किती सावध राहिले पाहिजे हे लक्षात येते. तसेच असे फोन कॉल्स करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही वैयक्तिक माहिती देणे टाळले पाहिजे. अन्यथा तुमच्या बँक खात्यातील रक्कमही काही क्षणात गायब होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर बँक खात्याची माहिती न देणे, कोणत्याही प्रकारचा ओटीपी, पिन, पासवर्ड शेअर न करणे या बाबी काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: Cyber crime, Technology

पुढील बातम्या