नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : नवीन स्मार्टफोन घेतला असेल आणि जुन्या फोनमधला WhatsApp Data नव्या फोनमध्ये कसा ट्रान्सफर करायचा याचं टेन्शन असेल, तर यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. काही स्टेप्स फॉलो करुन एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये WhatsApp Data ट्रान्सफर करता येतो. त्यासाठी Google Drive चीही गरज लागणार नाही.
- सर्वात आधी जुन्या फोनमध्ये WhatsApp Setting मध्ये चॅट ऑप्शनमध्ये, Chat backup वर क्लिक करा. अशाप्रकारे फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये WhatsApp चा लोकल बॅकअप येईल. यासाठी Google Drive ची गरज लागणार नाही.
- फोनमध्ये Play Store मधून RAR App डाउनलोड केल्यास, या App च्या मदतीने WhatsApp चा संपूर्ण डेटा एका फाइलमध्ये कंप्रेस करता येईल आणि फाइल कंप्रेशन App डाउनलोड करता येईल.
- RAR App ओपन करा. फोनची इंटरनल स्टोरेज डायरेक्टरी निवडा. पहिलं Android आणि त्यानंतर Media ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर ‘com.whatsapp’ फोल्डर निवडा. याच्या बाजूला असलेल्या टिक मार्कवर सिलेक्ट करा आणि फाइल कंप्रेस करण्यासाठी कमांड द्या. आता संपूर्ण डेटा एक .rar फाइलमध्ये कन्वर्ट करू शकता.
- कंप्रेस फाइल आपल्या नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करा, जिथे तुम्ही WhatsApp डाउनलोड करू इच्छिता. एकदा पुन्हा RAR App चा वापर करुन ही फाइल अनजिप करा. नव्या फोनच्या इंटरनल स्टोरेज डायरेक्टरीमध्ये त्याच फोल्डरमध्ये फाइल सेव्ह करा जिथे एक्सट्रॅक्ट केली होती.
- नव्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp डाउनलोड करा आणि App च्या आपल्या सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये Google Drive Backup चा ऑप्शन स्किप करा. त्यानंतर फोनच्या स्टोरेजमधून लोकल बॅकअप रिस्टोर करा आणि आपल्या नव्या फोनमध्ये संपूर्ण डेटा ट्रान्सफर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.