Home /News /technology /

अलर्ट! डेबिट, क्रेडिट कार्डाबाबत अशाप्रकारे कॉल आल्यास वेळीच व्हा सावधान, अन्यथा..

अलर्ट! डेबिट, क्रेडिट कार्डाबाबत अशाप्रकारे कॉल आल्यास वेळीच व्हा सावधान, अन्यथा..

देशात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. ज्या वेगात डिजिटल पेमेंट वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) नावाने फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : देशात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. ज्या वेगात डिजिटल पेमेंट वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) नावाने फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. फ्रॉड करणारे, आरबीआय, वर्ल्ड बँकेच्या खोट्या नावाने ग्राहकांची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. World Bank च्या नावाने डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी कॉल आल्यास सावध राहा. World Bank ने याबाबत इशारा दिला आहे. World Bank च्या नावाने खोटे कार्ड्स दिले जात असून त्यात World Bank चा लोगो आणि नावाचा वापर करण्यात आला आहे. भारतात अशाप्रकारे फ्रॉडची प्रकरणं समोर आल्याची माहिती वर्ल्ड बँकेला मिळताच, याबाबत बँकेने अलर्ट जारी केला आहे. World Bank कडून कोणत्याही प्रकराचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी करण्यात येत नसल्याचं बँकेने सांगितलं आहे. तसंच आमचा अशाप्रकारच्या कोणत्याही व्यक्ती किंवा समूहाशी संबंध नसून, आमच्या नावाने जारी करण्यात आलेले कार्ड्स खोटे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (वाचा - घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी देतंय YouTube! वाचा काय आहे प्रक्रिया) World Bank ने इशारा दिला असून, सर्वांना या फसवणूकीपासून सावध राहाण्याचं सांगितलं आहे. तसंच वर्ल्ड बँकेने त्यांच्या www.Worldbank.Org वेबसाईटवर बँकेबाबत, त्यांच्या प्रोगाम्सबाबत माहिती घेऊ शकत असल्याचं सांगितलं आहे. देशात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. ज्या वेगात डिजिटल पेमेंट वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. (वाचा - दिवाळीमध्ये पैशांची कमी?Paytm Postpaid वरून खरेदी करा, एक महिन्यानंतर पेमेंट करा) ऑनलाईन बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी - - आपले पर्सनल डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका. - तसंच तुमचं एटीएम पीन, सीवीवी नंबर आणि बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. - ATM पीन वेळोवेळी बदलत राहा. - कोणत्याही मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. - इंटरनेट बँकिंगचा वापर केवळ ऑफिशियल साईटवरून करा. - डेबिट, क्रेडिट इतर कोणत्याही कार्ड्सचे डिटेल्स कोणालाही शेअर करू नका. - जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये कोणतंही संशयास्पद ट्रान्झेक्शन झाल्यास, त्वरित त्याची माहिती बँकेला द्या. - कोटींची लॉटरी, किंवा काही पैसे जिंकण्याची माहिती असलेल्या कोणत्याही संशयास्पद ईमेलवर क्लिक करू नका.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या