• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • 'स्विच ऑफ' असलेल्या OnePlus स्मार्टफोनला अचानक मध्यरात्री लागली आग

'स्विच ऑफ' असलेल्या OnePlus स्मार्टफोनला अचानक मध्यरात्री लागली आग

OnePlus कंपनीच्या जुन्या फोनला मध्यरात्री अचानक आग लागल्याची तक्रार एका मोबाइल धारकाने केली आहे. फोन चार्जिंगला लावलेला नव्हता. तो स्वीच ऑफ केलेला होता, तरीही फोननं पेट घेतला, असं युजरचं म्हणणं आहे.

 • Share this:
  मुंबई, 5 जुलै : चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट होण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. जास्त चार्जिंगमुळे किंवा उष्णतेमुळे उन्हाळ्यात फोनने अचानक पेट घेतल्याच्या घटनाही तुम्ही ऐकल्या असतील. पण स्विच ऑफ असलेल्या फोनला अचानक मध्यरात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे. वन प्लस कंपनीचा पहिला फोन OnePlus One फोनला अशी अचानक आग लागल्याची तक्रार एका मोबाइल युजरने केली आहे. OnePlus Care ला ई-मेल द्वारे केल्या गेलेल्या तक्रारीमध्ये युजरने अशी माहिती दिली आहे की, फोन पॉवर अडाप्टरपासून दूर होता. तो सुरूही नव्हता. स्विच ऑफ केलेला होता. तरीही फोनमधून अचानक आवाज आला आणि फोन जळला. वेळीच लक्षात आल्यानं या घटनेमध्ये कोणतंही मोठं नुकसान झालं नाही असंही सांगण्यात आलं आहे. युजरच्या प्रसंगावधानामुळे फोन फुटण्याआधी आग लगेचच नियंत्रणात आणण्यात आली त्यामुळे मोठा धोका टळला. ई-मेल मध्ये करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ही घटना बुधवारी म्हणजेच 3 जुलै रोजी मध्यरात्री 3.15 ला घडली. ज्या खोलीमध्ये फोन होता. तिथे एसी सुरू होता, असंही मोबाईल युजरने लिहिलं आहे. 19 डिग्री तापमानावर एसी चालू होता. अचानक लागलेल्या आगीमुळे धूर झाला. आणि या धुरामुळे जाग आली, असं त्यांनी मेलमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर संपूर्ण खोलीमध्ये धूर झाला होता असं यूजरने सांगितलं. जिओचा धमाका: 200 रुपयात मिळवा अनलिमिडेट फायदे! धुरामुळे जाग आली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, बंद असलेल्या फोनचा स्फोट झाला आहे. त्यानंतर लगेच पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जाग आली नसती तर मोठा धोका निर्माण झाला असता अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
  आग लागलेल्या OnePlus फोनचं मॉडेल 5 वर्षं जुनं आहे, पण असं असलं तरी ते कोणाच्या जीवावर बेतू शकतं, हा मुद्दा त्यांनी मेलमध्ये मांडला आहे. त्यामुळेच संबंधीत युजरने OnePlus आणि Amazon या दोन्ही कंपन्यांकडे या घटनेची चौकशी करण्याची विनंती आपल्या ई मेलमधून केली. यापूर्वी OnePlus कंपनीच्या फोनची अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. त्याशिवाय, झालेला प्रकार हा वेगळा होता. कारण, फोन स्विच ऑफ असूनही त्याने पेट घेतला. याविषयी इंडिया टुडेच्या अँकरनी ट्विटर अकाउंटवरून One Plus ला टॅग केल्यानंतर याची दखल घेण्यात आली.
  या युजरने या ई मेलविषयी ट्विटरवरसुद्धा पोस्ट केली.  नंतर OnePlus Support च्या अधिकृत हँडलवरून याविषयी खुलासा करण्यात आला. कंपनीने युजरशी संपर्क साधला असून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उत्तर या हँडलवरून देण्यात आलं.
  VIDEO: सोनं आणि इंधनाचे दर वाढणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  Published by:Arundhati Ranade Joshi
  First published: