जिओचा धमाका: 200 रुपयात मिळवा अनलिमिडेट फायदे!

जिओचा धमाका: 200 रुपयात मिळवा अनलिमिडेट फायदे!

आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यात केवळ 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनेक फायदे मिळवता येतील.

  • Share this:

मुंबई, 4 जुलै : मोबाईल इंटरनेट सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्या ग्राहकांना आकर्षक प्लॅन देत असतात. पण जेव्हा स्वस्त आणि उत्तम प्लॅन कोण देतं असा प्रश्न विचारला जातो तेव्हा जिओ हेच नाव प्रथम समोर येतं. जिओचा कोणताही प्लॅन असो तो लॉन्ग टर्म प्लॅन असो की छोटे रिचार्ज ग्राहकांना अनेक मोफत सेवा मिळतात. इतकच नाही तर जिओकडून ग्राहकांना 50 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन दिले जातात. या प्लॅनचा वापर करुन JioPhone युझर्स एक महिना मोफत कॉल करु शकतात. पण आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यात केवळ 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनेक फायदे मिळवता येतील. तर जाणून घेऊयात काय आहेत हे फायदे...

असा आहे धमाकेदार प्लॅन...

जिओच्या या 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये युझर्सना याआधी 1.5GB डेटा मिळत होता. पण यात आता वाढ करण्यात आली आहे. आता युझर्सना 2GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. 2GB डेटासोबत तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळतात. इतक्यात या प्लॅनचे फायदे संपले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. या प्लॅन सोबत जिओच्या सर्व अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे.

नव्या अर्थमंत्र्यांकडून देशाला हवेत 'हे' 10 बदल

जिओच्या 499 चा प्लान घ्या, 3 महिने मिळेल फायचा

याशिवाय जिओच्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 महिन्यापर्यंत या सर्व सेवा मोफत घेता येतील. तुम्ही जर 449चा रिचार्ज केला त्याचे फायदे तुम्ही 91 दिवस घेऊ शकता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5GB डेटा प्रत्येक दिवशी मिळतो. म्हणजेत 91 दिवसात 136.5 GB डेटा मिळतो. याशिवाय प्रत्येक दिवशी 100 SMS आणि अनलिमिडेट कॉलिंग देखील करता येते.

 

SPECIAL REPORT: रोहित पवार मैदान मारणार की त्यांचाही 'पार्थ' होणार?

First published: July 4, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या