VIDEO : पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, माझ्या मुलाचा 'तैमुर' करण्याची इच्छा नाही

पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झालं. त्यानंतर शोएबनं एक व्हिडिओ शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 04:33 PM IST

VIDEO : पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, माझ्या मुलाचा 'तैमुर' करण्याची इच्छा नाही

रावळपिंडी, 05 जुलै : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला दुसऱ्यांदा अपत्यप्राप्ती झाली आहे. मुलगा झाल्यानंतर अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं म्हटलं की, माझ्या मुलाला बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा तैमूरसारखां करणार नाही.

शोएबला गुरुवारी पुत्ररत्न झाले. याचा आनंद साजरा करत त्यानं युट्यूबवर आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो की, मी आतापर्यंत मुलगा आणि पत्नीला भेटलो नाही पण दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. इतका आनंद झालाय की आपल्या या मुलाचं नाव काय ठेवायचं हे समजत नसल्याचं अख्तर म्हणाला.

अख्तर म्हणाला की, जगभरात जितके त्याचे चाहते आहेत त्या सर्वांनी मुलासाठी प्रार्थना करा. दुसऱ्यांदा बाप झाल्याचा आनंद आहे पण मुलाचा फोटो शेअर करणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. जेव्हा पहिल्यांदा मुलगा झाला तेव्हाही माझ्याकडून जबरदस्तीनं फोटो काढून घेण्यात आला होता.

सैफ अली खानचा मुलगा तैमूर ज्याप्रमाणे नेहमी लाइमलाइटमध्ये राहतो तसं माझ्या मुलाला करणार नाही. तैमूरच्या अवतीभोवती कॅमेरा असतो तसं माझ्या मुलाबाबत व्हायला नको अशी इच्छा असल्याचं अख्तर म्हणाला.

Loading...

शोएब अख्तरला याआधी एक मुलगा आहे. आता या दुसऱ्या मुलालासुद्धा देवानं चांगला माणूस करावं अशी प्रार्थना त्यानं केली आहे. जगभरातील चाहत्यांनी मुलासाठी नाव सुचवावं असंही त्यानं म्हटलं आहे.

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...