जगात अशी इलेक्ट्रिक कार बनवण्यात आली आहे जिचा कमाल वेग ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या इलेक्ट्रिक कारचा वेग 412 किमी ताशी आहे. या कारचे नाव 'रिमेक नेवेरा' (Rimac Nevera) आहे. ही कार जगातील सर्वात वेगाने धावणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. या कारला 0 ते 100 किमीचा वेग केवळ 1.97 सेकंदात गाठला. या कारला इलेक्ट्रिक हायपरकार (EV Hypercar) म्हटलं जात आहे. या कारनं अलीकडेच 412 किमीचा वेग गाठून तिनं विक्रम केला होता.
डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास, ही कार खूपच स्टायलिश दिसते. संपूर्ण कारच्या बॉडीवर स्कूल लाइन्स आहेत. यात 20 इंची अलॉय व्हील्स आहेत. ही कार बनवताना वापरल्या जाणार्या मटेरिअलचा विचार केला तर त्यामध्ये कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. हे मटेरियल स्टीलपेक्षा पाच पट हलकं आणि मजबूत आहे. यामुळे नेवरा रिमेक अतिशय हलकी कार बनते.
जर तुम्ही या कारच्या वेगामुळे प्रभावित होऊन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. कंपनीने या स्पीडसह कार ग्राहकांना विकण्यास नकार दिला आहे. केवळ 352 किमीचा वेग असलेली कार ग्राहकांना विकली जाईल. सध्या, क्रोएशियातील झाग्रेब येथील रिमेकच्या मुख्यालयात ग्राहकांसाठी कारचे उत्पादन केले जात आहे.