नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : ओला (Ola) टू-व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ओला इलेक्ट्रिक मॉबिलिटी (Ola Electric Mobility) जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिवस (World EV Day) अर्थात 8 सप्टेंबरबासून आपल्या इलेक्ट्रिक ओला एस-1 स्कूटरची विक्री सुरू करणार आहे. Ola S1 स्कूटरसाठी मासिक ईएमआय (EMI) 2999 रुपये प्रति महिनापासून सुरू आहे.
स्कूटर खरेदी करण्यासाठी फायनान्सची गरज असल्यास, ओला फायनेंशियल सर्विसेजने S1 स्कूटरला फायनान्स करण्यासाठी, मदतीसाठी IDFC Bank, HDFC Bank, TATA Capital सह प्रमुख बँकांसह करार केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरच्या अॅडव्हान्स वर्जन S1 Pro साठी EMI 3199 रुपयांपासून सुरू होणार आहे. HDFC बँक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅपवर ग्राहकांना काही मिनिटांत प्री-अप्रूव्ड ऑटो लोन (Pre-Approved Auto Loan) उपलब्ध करुन देईल.
टाटा कॅपिटल आणि आयडीएफसी फर्स्ट बँक डिजीटल केव्हासी प्रोसेस करतील. त्यानंतर ग्राहकांना इन्स्टंट लोन अप्रूव्हल दिलं जाईल. फायनान्सची गरज नसल्यास, Ola S1 साठी 20000 रुपये आणि Ola S1 Pro साठी 25000 रुपये अॅडव्हान्स पेमेंट करू शकता. इतर रक्कम स्कूटर इनवॉईस दरम्यान द्यावी लागेल. यासाठी डिलीव्हरी ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे.
याच महिन्यापासून कंपनी टेस्ट राईडही देणार आहे. टेस्ट राईडनंतर ऑर्डर कॅन्सल करण्याचा पर्याय आहे. ग्राहक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅपद्वारे स्कूटरचा इन्शोरन्सही करू शकतात. ICICI Lombard कंपनीचा इन्शोरन्स पार्टनर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.