मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /OLA ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात; अवघ्या 499 करु शकता बूक, एका चार्जवर 181 किमी धावणार

OLA ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात; अवघ्या 499 करु शकता बूक, एका चार्जवर 181 किमी धावणार

ओलाच्या दोन ई-स्कूटर्स येत्या ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना मिळणार असून, यासाठी 500 रुपयांपेक्षा कमी रुपयांत म्हणजे 499 रुपयांत नोंदणी करता येणार आहे.

ओलाच्या दोन ई-स्कूटर्स येत्या ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना मिळणार असून, यासाठी 500 रुपयांपेक्षा कमी रुपयांत म्हणजे 499 रुपयांत नोंदणी करता येणार आहे.

ओलाच्या दोन ई-स्कूटर्स येत्या ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना मिळणार असून, यासाठी 500 रुपयांपेक्षा कमी रुपयांत म्हणजे 499 रुपयांत नोंदणी करता येणार आहे.

    नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : देशात सध्या ओलाच्या (OLA) इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) जोरदार चर्चा सुरू आहे. देशात पेट्रोल, डिझेलवरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचं (Pollution) प्रमाण कमी करण्याकरता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या वाहन कंपन्याही चार चाकी कार्सही इलेक्ट्रिक स्वरुपात दाखल करत आहेत. त्याचवेळी ऑनलाइन टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला कंपनीनं दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत देशात इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Two Wheeler) दाखल करण्याची तयारी केली आहे.

    ऑक्टोबरमध्ये मिळणार ओलाच्या दोन ई-स्कूटर्स :

    ओलाच्या दोन ई-स्कूटर्स येत्या ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना मिळणार असून, यासाठी 500 रुपयांपेक्षा कमी रुपयांत म्हणजे 499 रुपयांत नोंदणी (Booking) करता येत आहे. या स्कूटर्सच्या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या 24 तासांत एक लाखाहून अधिक नोंदणी झाली आहे. 8 सप्टेंबरपासून लोकांना ही स्कूटर खरेदी करता येणार असून, ऑक्टोबरमध्ये त्यांना ही स्कूटर मिळणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलं आहे.

    आपल्या देशासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणं अत्यंत महत्त्वाचं असून, 2025 पर्यंत देशात प्रत्येक दुचाकी इलेक्ट्रिक असेल, असं ओलाचे अध्यक्ष भावेश अग्रवाल (Bhavesh Agrawal) यांनी म्हटलं आहे. ओलाने इलेक्ट्रिक स्कूटरचे तंत्रज्ञान भारतातच विकसित केलं असून, जगातील 50 टक्के इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात बनवलेल्या (Made in India) असाव्यात असं आपलं स्वप्न असल्याचंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

    OLA e-scooter भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे किंमत

    एस 1 आणि एस 1 प्रो :

    ओलानं एस 1 (S1) आणि एस 1 प्रो (S1Pro) अशा दोन स्कूटर्स आणल्या असून त्याची किंमत अनुक्रमे 99 हजार 999 आणि 1 लाख 29 हजार 999 रुपये आहे. एस 1 ही स्कूटर एकदा चार्ज केली की 121 किलोमीटर चालेल. तिचा कमाल वेग 90 किलोमीटर प्रती तास असेल. अवघ्या 3.6 सेकंदात ही स्कूटर 40 किलोमीटरचा वेग घेऊ शकते. या स्कूटरमध्ये नॉर्मल आणि स्पोर्ट असे दोन पर्याय आहेत.

    एस 1 प्रो ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 181 किलोमीटर चालेल. तिचा कमाल वेग 115 किलोमीटर प्रती तास असेल. अवघ्या 3 सेकंदात ती 40 किलोमीटरचा वेग घेईल. यामध्ये नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर असे तीन प्रकार आहेत. या दोन्ही स्कूटर्स दहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

    मासिक हप्त्यावर घेण्याचीही सुविधा :

    ओलाने या दोन्ही स्कूटर्स 2999 रुपये मासिक हप्त्यावर (EMI) घेण्याचीही सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच कंपनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनं या स्कूटर्सची विक्री करणार आहे. ऑफलाइन पद्धतीनं विक्री करण्यासाठी येत्या तीन महिन्यात देशातील प्रत्येक शहरात एक विक्री केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

    First published:
    top videos