Home /News /technology /

Facebook-Instagram यूजर्सवर पडेल पैशांचा पाऊस; स्वतः झुकरबर्ग यांनी सांगितली भन्नाट आयडिया

Facebook-Instagram यूजर्सवर पडेल पैशांचा पाऊस; स्वतः झुकरबर्ग यांनी सांगितली भन्नाट आयडिया

फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केवळ शेअरिंगच नाही तर तुम्हाला कमाईदेखील (Earning) करता येऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक कमाई करण्याचे नवे मार्ग नुकतेच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी सांगितले आहेत

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जून:  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social Media Platforms) वापर वेगानं वाढत आहे. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबातले सदस्य, कार्यालयीन सहकारी आदींशी कनेक्ट राहण्यासाठी तसंच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. इन्स्टाग्राम (Instagram) हे प्रामुख्यानं रील्स, व्हिडिओ आणि फोटो शेअरिंगसाठी वापरलं जातं. फेसबुकचा (Facebook) वापर यासोबतच चॅटिंग आणि कंटेंट शेअरिंगसाठीही होतो. जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केवळ शेअरिंगच नाही तर तुम्हाला कमाईदेखील (Earning) करता येऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक कमाई करण्याचे नवे मार्ग नुकतेच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी सांगितले आहेत. या विषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या क्रिएटरने (Creators) एक नवीन माहिती दिली आहे. त्यानुसार, आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून युजर्सना आर्थिक कमाईदेखील करता येणार आहे. यासाठी मेटाचे (Meta) सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कमाईसाठी काही फीचर्सची माहिती शेअर केली आहे. ``ही फीचर्स (Features) क्रिएटर्सना मेटाव्हर्समध्ये उपयोगी पडतील,`` असं झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे. या फीचर्समध्ये प्रामुख्याने फेसबुक स्टार्स, मोनेटायझिंग रील्स आणि इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शनचा समावेश असेल. आता कॉल उचलण्यासाठी नाही पडणार Smartphoneची गरज; हा Smart चश्मा करणार सगळी कामं
    डिजिटल कलेक्टीबिलीज (Digital collectibles) हे या फीचर्सपैकी एक आहे. ``कंपनी इन्स्टाग्रामवर एनएफटी डिस्प्लेसाठी तसंच जास्त क्रिएटर्सच्या सपोर्टसाठी विस्तार करत आहे. हे फीचर लवकरच फेसबुकवरही उपलब्ध करून देण्यात येईल,`` असं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं. क्रिएटर मार्केटप्लेस (Creator Marketplace) हे देखील एक अनोखं फीचर असेल. मार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटानं इन्स्टाग्रामवर या फीचरचं टेस्टिंग सुरू केलं आहे. या माध्यमातून क्रिएटर्सना सर्च आणि पेमेंट केलं जाईल. या माध्यमातून ब्रॅंड पार्टनरशीपच्या नव्या संधी शेअर करता येतील.  इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शन (Interoperable subscriptions) फीचरच्या माध्यमातून सब्सक्रायबरनं ज्या क्रिएटरसाठी पेमेंट केलं आहे, अशा सब्सक्रायबरला Subscribe-only Facebook Groupsमध्ये प्रवेश देईल. झुकरबर्ग म्हणाले, ``क्रिएटर्ससाठी फेसबुक स्टार्स (Facebook Stars) नावाचं फीचर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना रील्स, लाईव्ह किंवा व्हिडिओच्या माध्यमातून कमाई करता येईल.`` मेटा कंपनी क्रिएटर्ससाठी रील्स प्ले प्रोग्रॅम (Reels Play Program) सुरू करणार आहे. यामुळे क्रिएटर्सना त्यांचे इन्स्टाग्राम रील्स फेसबुकवर क्रॉस पोस्ट करण्याची आणि मोनेटाइज करण्याची सुविधा मिळेल. एकूणच या पाच अनोख्या फीचर्सच्या माध्यमातून फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना पैसे कमवण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर शेअरिंगसोबतच आर्थिक फायद्यासाठी करता येणार आहे.
    First published:

    Tags: Career, Facebook, Instagram, Money, Social media, Technology, Zuckerberg

    पुढील बातम्या