जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता कॉल उचलण्यासाठी नाही पडणार Smartphoneची गरज; हा Smart चश्मा करणार सगळी कामं

आता कॉल उचलण्यासाठी नाही पडणार Smartphoneची गरज; हा Smart चश्मा करणार सगळी कामं

आता कॉल उचलण्यासाठी नाही पडणार Smartphoneची गरज, हा Smart चश्मा करणार सगळी कामं

आता कॉल उचलण्यासाठी नाही पडणार Smartphoneची गरज, हा Smart चश्मा करणार सगळी कामं

दृष्टी अधिक स्पष्ट व्हावी यासाठी आपण चष्म्याचा वापर करतो; पण आता प्रगत तंत्रज्ञानामुळे चष्म्याचा वापर वेगळ्या कारणांसाठी करता येणार आहे.

    मुंबई, 21 जून: गरजेच्या वस्तूंमध्ये काळानुरुप बदल होत चालला आहे. काही वर्षांपूर्वी कोणालाही माहिती नसलेला स्मार्टफोन (Smartphone) सध्याच्या काळात अत्यंत गरजेचा बनला आहे. रोज आपण स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स (Electronic gadgets) वापरतो. तंत्रज्ञानात (Technology) सातत्यानं बदल होत असल्यानं रोज नवी गॅजेट्स बाजारात दाखल होत आहेत. दृष्टी अधिक स्पष्ट व्हावी यासाठी आपण चष्म्याचा वापर करतो; पण आता प्रगत तंत्रज्ञानामुळे चष्म्याचा वापर वेगळ्या कारणांसाठी करता येणार आहे. जी कामं तुम्ही सध्या स्मार्टफोनच्या मदतीनं करता, ती कामं लवकरच चष्म्याच्या (Eye Glasses) मदतीनं करता येणार आहेत. कदाचित क्षणभर तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. बाजारात लेटेस्ट स्मार्ट ग्लासेस (Smart Glasses) दाखल झाल्या आहेत. या ग्लासेस अर्थात चष्म्यात अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे याची किंमत फार नाही. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अधिक प्रगत होत चाललं आहे. सध्या स्मार्टफोनच्या मदतीनं आपण संवाद साधण्यासोबतच अनेक कामं करू शकतो; पण आता स्मार्ट ग्लासेस हे नवं तंत्रज्ञान बाजारात दाखल झालं आहे. जी कामं तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीनं करता, ती कामं आता स्मार्ट ग्लासेसच्या मदतीनं करता येणार आहेत. नॉइज या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स उत्पादक कंपनीने (Noise) नव्या स्मार्ट ग्लासेस लॉंच केल्या आहेत. या स्मार्ट ग्लासेसमध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत. नॉइज कंपनीनं उत्पादित केलेला हा पहिला स्मार्ट आयवेअर (Smart Eyewear) असून, ते लिमिटेड एडिशन डिव्हाइस आहे. या ग्लासेसची किंमत 5999 रुपये असून, नॉइज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही या स्मार्ट ग्लासेस खरेदी करू शकता. हेही वाचा - तुमच्या Smartphone ला बनवा TV, फ्रीमध्ये पाहा चित्रपट आणि Live Cricket! नॉइज आय 1 स्मार्ट ग्लासेस (Noise i1 Smart Glasses) ब्लूटूथ व्हर्जन 5.1 वर काम करतात. खास फीचर्स असलेल्या या स्मार्ट ग्लासेसमध्ये ब्लू लाइट फिल्टरिंग ट्रान्स्परंट लेन्स असून, यामुळे युझर्सच्या डोळ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. धोकादायक यूव्ही रेजपासूनही (UV Rays) युझर्सचं संरक्षण होतं. या ग्लासेस पाणी आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहेत. नॉइज आय 1 स्मार्ट ग्लासेस एकदा चार्ज केल्यानंतर 9 तासांपर्यंत वापरता येतात. याला फास्ट चार्जिंग सपोर्टही (Fast Charging Support) देण्यात आला आहे. 15 मिनिटं चार्जिंग केल्यावर तुम्ही या ग्लासेसच्या साह्याने 120 मिनिटं संगीत ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. नॉइज आय 1 स्मार्ट ग्लासेसची निर्मिती भारतात केली गेली आहे. यात मोशन इस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन आणि मॅग्नेटिक चार्जिंगसारखी आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत. यात मल्टी फंक्शनल टच कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. या सिस्टीमच्या साह्याने तुम्ही कॉल स्वीकारू किंवा रिसीव्ह करू शकता. म्युझिक कंट्रोल करू शकता. या सिस्टीममुळे व्हॉइस असिस्टंट फीचरही अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. एकूणच हे नवं तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर आणि आकर्षक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Tech news
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात