मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

काय सांगता! WhatsApp वर फक्त चॅटिंग करून नका; पैसेही कमावण्याची संधी; फक्त करावं लागेल हे काम

काय सांगता! WhatsApp वर फक्त चॅटिंग करून नका; पैसेही कमावण्याची संधी; फक्त करावं लागेल हे काम

असा मिळवा कॅशबॅक

असा मिळवा कॅशबॅक

आता याद्वारे तुम्हाला पैसेदेखील कमवता येणार आहे. हे पैसे तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहेत.

मुंबई, 01 जून: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे आता प्रत्येक मोबाईल युजरसाठी महत्त्वाचं अ‍ॅप झालं आहे. या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आपण ग्रुपममध्ये किंवा व्यक्तिगत चॅट करू शकतो. व्हिडिओ कॉलिंगची सुविधादेखील व्हॉट्सअ‍ॅप देतं. परंतु, आता इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप (Instant Messaging App) अशी ओळख असलेलं हे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटसाठी (Online Payments) देखील वापरलं जाऊ लागलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना (WhatsApp User) ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता याद्वारे तुम्हाला पैसेदेखील कमवता येणार आहे. हे पैसे तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहेत. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यामातून तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला 35 रुपये कॅशबॅक (Cashback on WhatsApp) मिळणार आहे. परंतु, ही ऑफर प्रत्येक युजरसाठी आणि प्रत्येक व्यवहारावर लागू नसेल. त्यासाठी कंपनीने काही अटी लागू केल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचा पर्याय वापरून पहिला व्यवहार केल्यानंतर तुम्हाला त्यावर कॅशबॅक (WhatsApp Cashback Offer) मिळणार आहे. युजर्सना या ऑफरचा लाभ फक्त तीन वेळा वेगवेगळ्या पेमेंट ट्रान्सफरवर ( WhatsApp Payment Transfers) घेता येईल. मात्र व्हॉट्सअ‍ॅप कॅशबॅक मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. फ्रीमध्ये मूव्ही, वेब सीरिज पाहायचं आहे? हे 5 Apps करा इन्स्टॉल
काय आहे ऑफर?
व्हॉट्सअ‍ॅपची ही कॅशबॅक ऑफर वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कॅशबॅक ऑफर असेल तेव्हाच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे तसंच तुम्ही केवळ इतर व्हॉट्सअ‍ॅप युजरनाच पेमेंट केलं तरच तुम्हाला ही कॅशबॅक मिळेल. कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप युजरला पैसे ट्रान्सफर करून 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. विशेष म्हणजे या ऑफरसाठी किमान रकमेची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे तुम्ही कितीही रक्कम ट्रान्सफर करून या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकता. केवळ तीन वेळाच तुम्हाला कॅशबॅक मिळेल. यासाठी तुम्हाला वेगवेगेळ्या तीन पेमेंट वापरणाऱ्या युजर्सना वेगवेगळं पेमेंट करावं लागेल. एका युजरला पेमेंट केल्यास तुम्हाला केवळ एकदाच कॅशबॅक मिळेल. WhatsApp Fraud: इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी चुकूनही डायल करू नका हा नंबर
कोणत्या आहेत अटी? तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी काही अटीदेखील पूर्ण कराव्या लागतील. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट खातं किमान 30 दिवसांपूर्वी वापरायला सुरू केलेलं असणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स व्हॉट्सअ‍ॅपशी लिंक करावे लागतील. तुम्ही ज्या व्यक्तीला पेमेंट करणार असाल ती व्यक्तीदेखील व्हॉट्सअ‍ॅपवर असणं आवश्यक आहे. एकंदरीतच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचे आणि तुम्ही ज्याला पेमेंट पाठवणार आहात ती व्यक्ती दोघांचेही व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट खाते सक्रिय असणं आवश्यक आहे.
First published:

Tags: Technology, Whatsapp

पुढील बातम्या