नवी दिल्ली, 29 मे : मागील काही वर्षांपासून ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्मची क्रेझ भारतात वाढली आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाउमुळे याच्या वापरात अधिकच वाढ झाली, पॉप्युलॅरिटी इतकी वाढली की आता अनेक मोठ्या फिल्म्स याच प्लॅटफॉर्मवर थेट रिलीजही केल्या जातात. भारतात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, झी 5, सोनी लिव्ह, डिझ्ने हॉट स्टार प्लस आणि इतर अनेक पेड ओटीटी App आहेत. या Apps वर सतत वेब सीरिज, मूव्ही येत असतात. पण हे पाहण्यासाठी युजर्सला यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. त्यासाठी पैसे भरावे लागतात.
सर्वांनाच हे सब्सक्रिप्शन परवडेल असं नाही. तसंच दर महिन्याला ते घेता येतचं असं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काही App असे आहेत, जे मोफत येतात. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. कोणतेही पैसे न देता तुम्ही या OTT Apps वर फिल्म, वेब सीरिज, टीव्ही शोज पाहू शकता.
MX Player -
एमएक्स प्लेअर अनेक वर्षांपूर्वी ऑफलाइन व्हिडीओ प्लेअर रुपात बाजारात आलं होतं. हळूहळू हे ओटीटी App मध्ये बदललं. परंतु हे पूर्णपणे फ्री आहे. यासाठी कोणतंही सब्सक्रिप्शन युजरला द्यावं लागत नाही. हे App फ्री आहे. या App वर 12 भाषांमध्ये कंटेंट पाहायला मिळतो. या App वर अनेक वेब सीरिजपासून पॉप्युलर सीरियल आणि मूव्ही पाहता येतात.
JioCinema -
जिओने लाँचिंगच्या काही दिवसांनंतर आपल्या App मध्ये जिओ सिनेमाचा एक ऑप्शन दिला. हे App गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करता येतं. यावर युजर सिनेमा, टीव्ही सीरिज पाहू शकतात. हे App फ्री आहे. तसंच अनेक भाषेचा कंटेंट पाहता येतो.
Voot -
फ्री वेब सीरिज, सीरियल आणि इतर कंटेंट पाहण्यासाठी वूट चांगला पर्याय आहे. Voot गुगल प्ले स्टोर आणि App स्टोरवरुन डाउनलोड करता येतं. त्यानंतर साइन इन करुन कंटेंट पाहण्याची संधी मिळते.
Tubi -
Tubi अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना हॉलिवूड चित्रपट पाहायचे असतात. हे App देखील फ्री आबे. Tubi वर अनेक हॉलिवूड मूव्ही पाहता येतात. पण या App वर अनेक जाहिरातीही मध्ये मध्ये पाहायला मिळतात.
Plex -
Plex स्ट्रिमिंग सर्विसदेखील फ्रीमध्ये मूव्ही आणि टीव्ही शोज पाहण्याचा पर्याय देतं. या OTT App वर 200 हून अधिक लाइव्ह चॅनल्स फ्रीमध्ये पाहता येतात. यात हिंदी भाषा असणारे अनेक प्रोग्रामही सामिल आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.