जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp Fraud: इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी चुकूनही डायल करू नका हा नंबर

WhatsApp Fraud: इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी चुकूनही डायल करू नका हा नंबर

WhatsApp Fraud: इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी चुकूनही डायल करू नका हा नंबर

हॅकर्सनी WhatsApp द्वारे फ्रॉड करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. हा मार्ग इतना सोपा आहे, की लोक सहजपणे या फ्रॉडमध्ये अडकतात. परंतु काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असून फ्रॉडपासून तुम्ही बचाव करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मे : टेक्नोलॉजी हायटेक आणि अपडेट होत असताना दुसरीकडे सायबर क्रिमिनल्सदेखील स्वत:ला अपडेट करत आहेत आणि फसवणुकीच्या नव्या-नव्या पद्धती काढत आहेत. आता हॅकर्सनी WhatsApp द्वारे फ्रॉड करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. हा मार्ग इतना सोपा आहे, की लोक सहजपणे या फ्रॉडमध्ये अडकतात. परंतु काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असून फ्रॉडपासून तुम्ही बचाव करू शकता. रिपोर्टनुसार, हॅकर्स WhatsApp द्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. फसवणुकीसाठी ते इंटरनेट स्पीडचा बहाणा देतात. फ्रॉडस्टर्स युजर्सला कॉल करतात. त्यानंतर इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी मदत करणार असल्याचं सांगतात. जे लोक फ्रॉडस्टर जे काही सांगत आहे ते खरं असल्याचं समजून त्यांच्या बोलण्यात येतात, त्यांचं मोठं नुकसान होतं. युजर त्यांच्या बोलण्यात आल्यानंतर फ्रॉडस्टर त्यांना एक नंबर डायल करण्यासाठी सांगतात. *401* नंबर मोबाइलवर डायल करण्यासाठी सांगतात. हा नंबर डायल केल्यानंतर युजरच्या WhatsApp वर PIN साठी एक मेसेज येतो. हा PIN फ्रॉडस्टरला मिळाल्यानंतर युजरचं WhatsApp Account लॉगआउट होऊन हॅक होतं. त्यानंतर फ्रॉडस्टर युजरच्या WhatsApp अकाउंटद्वारे युजरच्या मित्रांना, नातेवाईकांना अतिशय इमरजेन्सीमध्ये असल्याचं सांगत पैशांची मागणी करतात. काही लोक आपल्याच मित्राने पैसे मागितले असल्याचं समजून पैसे देतात. कोणत्याही कंपनी किंवा इतर कोणी इंटरनेट स्पीड किंवा इतर काही कारणाने काम करुन कोणताही नंबर डायल करण्यासाठी सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. नंबर डायल करू नका. कंपनीने कॉल केल्यास कंपनी कधीही खासगी माहिती विचारत नाही. कोणताही नंबर डायल करण्यासाठी सांगत नाही. तुम्ही एखाद्यावेळी अधिक काळ मोबाइल नेटवर्कमध्ये नसाल, तर याची सूचना पोलिसांना द्या. तसंच कोणी तुमच्याकडे WhatsApp वरुन पैसे मागितल्यास त्या व्यक्तीला एकदा फोन करुन क्रॉसचेक करा. तुमचे पीन नंबर, ओटीपी, बँक कार्ड डिटेल्स, आधार कार्ड नंबर, पॅन नंबर कोणालाही देऊ नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात