मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भविष्यातील डिजिटल विश्वाचं नेतृत्व भारताकडेच, मुकेश अंबानींना विश्वास

भविष्यातील डिजिटल विश्वाचं नेतृत्व भारताकडेच, मुकेश अंबानींना विश्वास

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि तरुणांची सर्वाधिक संख्या असणारा भारत 5G तंत्रज्ञान आल्यानंतर डिजिटल विश्वाचं नेतृत्व करेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि तरुणांची सर्वाधिक संख्या असणारा भारत 5G तंत्रज्ञान आल्यानंतर डिजिटल विश्वाचं नेतृत्व करेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि तरुणांची सर्वाधिक संख्या असणारा भारत 5G तंत्रज्ञान आल्यानंतर डिजिटल विश्वाचं नेतृत्व करेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 3 डिसेंबर: माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात भारत हा जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास (IT revolution to make India digital leader says Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. एकविसाव्या शतकाची पहिली दोन शतकं (Two decades of new millennium) ही जगभरातील कनेक्टिव्हीटी वाढण्यासाठी महत्त्वाची होती. भारतातही या दोन दशकांत कनेक्टिव्हिटी (Speed of connectivity developments) वाढण्याचा वेग हा अभूतपूर्व होता. आता यानंतरचा टप्पा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं नेतृत्व जागतिक पातळीवर कोण करणार हा असून भारतातील धोरणं, तंत्रज्ञान आणि ज्ञान या गोष्टींचा विचार करता, आपला देशच जगाचं नेतृत्व करताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. इंटरनॅशनल फायनान्शिअल सेव्हिसेस सेंटर आणि ब्लुमबर्ग एशिया इन्फिनिटी फोरमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

आय़ुष्यात पाहिलेली स्थित्यंतर

आपण सध्या 63 वर्षांचे असून आपल्या आयुष्यात आतापर्यंत माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत 4 स्थित्यंतरं पाहिल्याचं मुकेश अंबानी म्हणाले. पहिलं स्थित्यंतर जेव्हा भारतात कॉम्प्युटर आले, तेव्हा झालं. काही निवडक लोकांकडेच कॉम्प्युटर असण्याच्या अवस्थेपासून हजारो लोकांकडे कॉम्प्युटर येण्यापर्यंतचं हे स्थित्यंतर होतं. आपण 70 च्या दशकात केमिकल इंजिनिअरिंगला असण्याच्या काळात हे स्थित्यंतर पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर कॉम्प्युटर ते आयसीटी क्रांती, हे दुसरं स्थित्यंतर होतं. मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरात येणं, हे दुसरं स्थित्यंतर होतं. मोबाईल आणि इंटरनेट हे जेव्हा एक झाले, ते तिसरं स्थित्यंतर होतं. भारतात इंटरनेटचा वापर वाढला, तो याच काळात. सध्या ज्या प्रकारे जगभरातील कोट्यवधी नागरिक डिजिटल विश्वात सहभागी होत आहेत, हे चौथं स्थित्यंतर असल्याचं अंबानी म्हणाले. या स्थित्यंतराचा वेग प्रचंड असून लवकरच आपण एक डिजिटल सोसायटी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

डेटा हेच नवं ऑईल

डेटा हे नवं ऑईल आहे, असं आपण नेहमी म्हणतो. मात्र त्यात एक फरक असल्याचं अंबानी म्हणाले. खरं ऑईल हे काही ठराविक ठिकाणीच सापडतं आणि उत्पादित होतं. मात्र डेटा हे असं ऑईल आहे जे प्रत्येक देशात तयार होतं आणि प्रत्येकजण त्याचा वापर करत असतो. आपण लवकरच जगातील सर्वधिक लोकसंख्या असणारा आणि सर्वाधिक तरुण असणारा देश होणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे डेटाचा वापर वाढत जाणार असल्याचं ते म्हणाले.

ग्रामीण भागात क्रांती

इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येकजण एकमेकांशी जोडला गेला असून जिओच्या माध्यमातन स्वस्त आणि हायस्पीड डेटा पुऱवण्याचं काम रिलायन्स करत असल्याचं ते म्हणाले.

असं असेल नवं तंत्रज्ञान

आयओटी (Internet of Things) ही नजिकच्या भविष्यात येऊ घातलेलं तंत्रज्ञान असून वेगवेगळी यंत्र, डिव्हाईसेस आणि वाहनंदेखील इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. पुढील वर्षी जेव्हा भारतात 5G तंत्रज्ञान उपलब्ध होईल, तेव्हा जगाच्या इतिहासातील ती मोठी क्रांती असेल, तर त्यांनी सांगितलं.

हे वाचा-'...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करु', अनिल परबांचा मोठा इशारा

योग्य धोरणांची गरज

तंत्रज्ञान नवनवी क्षितीजं पादाक्रांत करत असताना नागरिकांच्या प्रायव्हसीची काळजी घेणं, हे मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. याचा विचार करूनच धोरणं ठरवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

First published:

Tags: Digital services, Mukesh ambani, Rich World