नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 268 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. एक किलोग्रॅम चांदीचे दर 1623 रुपयांनी वाढले आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात सोन्या-चांदीचे दर वाढले असून भारतीय बाजारातही त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. सोन्याचे आजचे दर (Gold Price, 2 November 2020) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 268 रुपयांची वाढ झाली असून 99.0 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 50,812 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 50,544 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1873 डॉलर प्रति औंस होता. चांदीचे आजचे दर (Silver Price, 2 November 2020) - चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी 1623 रुपये प्रति किलोग्रॅम महाग झाली. त्यामुळे चांदीचे दर 60,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत.
(वाचा - कमी पैशात मोठी कमाई देणारा बिझनेस; महिन्याला कमवा एक लाखांपर्यंत रक्कम )
का वाढले सोन्या-चांदीचे भाव - एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, परकीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती सुधारल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ आणि अमेरिकेत आर्थिक प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेस उशीर होत असल्याने, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
(वाचा - Loan Moratorium: कसा आणि किती मिळणार या व्याजमाफीचा फायदा, सरकारनं दिलं उत्तर )
दरम्यान, अमेरिकेत लवकरच प्रोत्साहन आर्थिक पॅकेजची (Stimulus Package) घोषणा होऊ शकते. त्याशिवाय डॉलरही कमकुवत होण्याची शक्यता आहे. चलनात आलेल्या कमजोरीदरम्यान सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता, जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.