मुंबई, 4 मे : सोशल मीडिया अॅप ट्विटरची (Twitter) मालकी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांच्याकडे गेल्यानंतर ट्विटरमध्ये काही बदल होतील असं आधीच बोललं जात होतं. त्याप्रमाणे यात हळूहळू बदल होऊ लागले आहे. इलॉन मस्क यांनी म्हटलं की ट्विटर इंक व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांकडून नाममात्र शुल्क आकारू शकते. मात्र, सामान्य यूजर्ससाठी ट्वीटर नेहमीच फ्री असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “ट्विटर नेहमी सामान्य यूजरसाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते,” असं ट्वीट इलॉन मस्क यांनी केलं आहे.
Twitter will always be free for casual users, but maybe a slight cost for commercial/government users
— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022
मस्क गेल्या महिन्यापासून ट्विटरवर अनेक बदल सुचवत आहेत. नुकतीच कंपनी विकत घेतल्यानंतर, मस्क यांनी सांगितले की त्यांना नवीन फीचर्ससह कंपनीला पुढे न्यायचे आहे. तुम्ही Google Chrome वापरता? लगेच करा हे काम, सरकारचा मोठा इशारा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, ट्विटरने इलॉन मस्क यांना कंपनीची 44 बिलियन डॉलरमध्ये विक्री केल्याची पुष्टी केली. ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क त्याचे मॅनेजमेंट पूर्णपणे बदलू शकतात. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांना ते बाहेरचा रस्ता दाखवू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. इलॉन मस्क यांना कंपनीमध्ये अनेक मोठे बदल करायचे आहेत, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. पराग अग्रवाल आणि विजया गडदे यांना हटवले जाणार असले तरी अद्याप कोणीही याला दुजोरा दिलेला नाही. बॅगमध्येच झाला Realme Smartphone चा ब्लास्ट, फोटो पाहून कंपनीने दिलं असं उत्तर या सेवेसाठी शुल्क आधीच लागू Twitter मध्ये फी आधारित सेवा नवीन नाहीत. सध्या ऑफर केली जात असलेली Twitter ब्लू सेवा देखील फी आधारित आहे. नाममात्र मासिक शुल्काच्या आधारे, ट्विटरचे हे विशेष फीचर आणि अॅपची सुविधा त्याच्या ग्राहकांना प्रदान केली जाते. हे फीचर सध्या फक्त अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये उपलब्ध आहे. जगभरातील सरकारी आणि व्यावसायिक यूजर्सचा एक मोठा वर्ग देखील आहे जो Twitter वापरतो. शुल्क आकारणीमुळे त्याचा फटका बसणार आहे.

)







