मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता डेबिट कार्डची गरज नाही, UPI द्वारे QR कोड स्कॅन करुन ATM मधून काढता येणार पैसे

आता डेबिट कार्डची गरज नाही, UPI द्वारे QR कोड स्कॅन करुन ATM मधून काढता येणार पैसे

एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) यूपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विद्ड्रॉल सॉल्यूशन (ICCW) लाँच केलं आहे.

एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) यूपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विद्ड्रॉल सॉल्यूशन (ICCW) लाँच केलं आहे.

एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) यूपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विद्ड्रॉल सॉल्यूशन (ICCW) लाँच केलं आहे.

नवी दिल्ली, 4 एप्रिल : आता विना डेबिट कार्डही एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत. एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) यूपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विद्ड्रॉल सॉल्यूशन (ICCW) लाँच केलं आहे. या माध्यमातून यूपीआय अ‍ॅपद्वारे (UPI App) क्यूआर कोड स्कॅन करुन एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.

या खास सुविधेसह एटीएम इंस्टॉल करण्यासाठी सिटी यूनियन बँकने एनसीआर कॉर्पोरेशनसह काम करण्याचं सांगितलं आहे. बँकेने आतापर्यंत 1500 हून अधिक एटीएमला या सुविधेशी अपग्रेड केलं आहे.

(वाचा - WhatsApp डिलीट करायचंय पण डेटा गमावण्याची भीती?या पद्धतीने सुरक्षित ठेवा माहिती)

असे काढता येतील पैसे -

- सर्वात आधी स्मार्टफोनवर कोणतंही यूपीआय अ‍ॅप्लिकेशन ओपन करावं लागेल.

- त्यानंतर एटीएम स्क्रिनवर असलेला QR code स्कॅन करा.

- आता फोनवर हवी ती अमाउंट टाका. सध्या या सुविधेद्वारे एका वेळी अधिकाधिक 5 हजार रुपये काढता येऊ शकतात.

- आता Proceed बटणावर क्लिक करुन कन्फर्म करा.

- त्यानंतर 4 किंवा 6 अंकी यूपीआय पीन नंबर एंटर करा.

- या प्रोसेसनंतर कॅश एटीएममधून मिळवता येईल.

(वाचा - Google Map वर असं अ‍ॅड करा तुमचं शॉप; जाणून घ्या प्रोसेस)

काय आहे यूपीआय -

यूनिफाईड पेमेंट इंटरफेस/यूपीआय (Unified Payments Interface) एक रियल टाईम पेमेंट सिस्टम आहे, जे मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतं. यूपीआयच्या माध्यमातून युजर्स एका बँक अकाउंटला अनेक यूपीआय अ‍ॅपशी लिंक करु शकतात. तसंच अनेक बँक अकाउंटही एका यूपीआय अ‍ॅपद्वारे ऑपरेट करता येतात.

First published:

Tags: ATM, QR code payment