जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना एडिट करता येणार पाठवलेला मेसेज, पाहा कधी लाँच होणार नवीन फीचर

आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना एडिट करता येणार पाठवलेला मेसेज, पाहा कधी लाँच होणार नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅपचं  नवं फिचर?

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर?

एडिट फीचरवर खूप दिवसांपासून बातम्या येत होत्या, पण आता खरोखरंच नवीन फीचर लवकरच रोल आउट होणार आहे. नवीन फीचरमुळे आपल्याला मेसेज एडिट करता येईल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. युजर्सना त्यांनी पाठवलेले मेसेज एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. होय, व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर आणण्यासाठी काम सुरू केलंय आणि ते लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतं असं म्हटलं जातंय. अलीकडेच Apple ने सर्व आयफोन युजर्ससाठी त्यांचं लेटेस्ट व्हर्जन iOS 16 रोल आऊट केलंय. ज्यामध्ये निफ्टी फीचर्सचा एक ग्रुप तयार करण्यात आलाय. हे वारंवार टायपो करणाऱ्या आणि चुकून मेसेज पाठवणाऱ्या लोकांसाठी वरदान आहे.

    iOS 16 च्या येण्याने आयफोन युजर्स पाठवलेले मेसेज एडिट करू शकतील आणि ते स्वतःलाही मेसेज पाठवू शकतील. आता व्हॉट्सअ‍ॅप अशाचप्रकारचं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. WhatsApp च्या अपडेट ट्रॅकर, Wabetainfo ने पुष्टी केली आहे, की व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉप अ‍ॅपवर भविष्यातील अपडेटमध्ये मेसेज एडिट करण्याची क्षमता आणण्यासाठी काम करत आहे. हे फीचर सर्वात अलीकडच्या Android बीटामध्ये दिसून आलंय.

    हेही वाचा -  कारला सेफ्टी रेटिंग कसं मिळतं? 5 स्टार मिळवण्यासाठी कोणती फीचर्स आवश्यक आहेत, जाणून घ्या

    WabetaInfo ने एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितलं, की ‘एडिट फीचरवर खूप दिवसांपासून बातम्या येत होत्या, पण आता खरोखरंच नवीन फीचर लवकरच रोल आउट होणार आहे. नवीन फीचरमुळे आपल्याला मेसेज एडिट करता येईल. व्हॉट्सअ‍ॅप अजूनही अ‍ॅपच्या भविष्यातील रिलीजमध्ये याची अंमलबजावणी करण्याचा विचार करत आहे.’ यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकरने एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp एक नवीन व्ह्यू डेव्हलप करत आहे, जो iOS 16 अपडेटसह iMessage फीचरप्रमाणेच लोकांना मूळ मेसेजमध्ये बदल करण्यासाठी टेस्क्ट एडिट करण्याचा ऑप्शन देईल. हे फीचर्स अजूनही डेव्हलप होतंय, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना या आगामी फीचरसह मेसेज एडिट करण्यासाठी किती वेळ मिळेल, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

    हेही वाचा -  सोशल मीडियाशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सरकारनं केला आयटी नियमांमध्ये बदल

    या शिवाय रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, ‘एडिट हिस्ट्री उपलब्ध नसावी, परंतु हे वैशिष्ट्य विकासाधीन असल्याने, भविष्यात हे वैशिष्ट्य प्रसिद्ध होण्यापूर्वी ते लागू केलं जाऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीत आम्ही काही नवीन शोध लावल्यावर तुम्हाला कळवू. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हे एडिट मेसेज फीचर कधी मिळेल? हे अजून स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण या फीचरमध्ये लवकरात लवकर डेव्हलपमेंट होईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.’ दरम्यान हे फीचर प्रत्यक्षात कधी येईल, याबद्दल माहिती देण्यात आली नसली, तरी एक चांगली सुविधा युजर्सना मिळणार आहे, हे मात्र नक्की.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात