मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp, Signal, Telegram; आता इन्स्टंट मेसेजिंग ॲपवरही द्या ऑटो रिप्लाय

WhatsApp, Signal, Telegram; आता इन्स्टंट मेसेजिंग ॲपवरही द्या ऑटो रिप्लाय

ऑटो रिप्लायच्या (auto reply) माध्यमातून युझर कोणत्याही मेसेजला एका ठराविक मेसेजच्या स्वरुपात रिप्लाय देऊ शकतो.

ऑटो रिप्लायच्या (auto reply) माध्यमातून युझर कोणत्याही मेसेजला एका ठराविक मेसेजच्या स्वरुपात रिप्लाय देऊ शकतो.

ऑटो रिप्लायच्या (auto reply) माध्यमातून युझर कोणत्याही मेसेजला एका ठराविक मेसेजच्या स्वरुपात रिप्लाय देऊ शकतो.

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : बिझी असल्यावर किंवा मेसेजला रिप्लाय द्यायला वेळ नसेल तेव्हा ऑटो रिप्लाय (Auto Replay) खूप उपयुक्त ठरतं.  हे फिचर स्मार्टफोनमधील अत्यंत उपयुक्त असं फिचर आहे. ऑटो रिप्लायच्या माध्यमातून युझर कोणत्याही मेसेजला (Messeage) एका ठराविक मेसेजच्या स्वरुपात रिप्लाय देऊ शकतो. यासाठी फोन हातात घेण्याची गरज नाही. युझरने जो मेसेज सेट केला आहे, तो रिप्लाय म्हणून संबंधित व्यक्तीला पाठवता येतो.

ऑटो रिप्लाय हे फिचर (Feature) सामान्यतः इमेल क्लायेंट, आऊटलुक (Outlook) आणि जीमेलवर (Gmail) सारख्या प्लॅटफार्मवर उपलब्ध आहे. व्हॉट्सॲप (WhatsApp), सिग्नल (Signal) आणि टेलिग्राम (Telegram) सारख्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर या फिचरची कमतरता जाणवत होती. आता या अॅपवरदेखील हे फिचर उपलब्ध झालं आहे.

या फिचरच्या माध्यमातून युझर एका ठराविक सेट केलेल्या मेसेज संबंधिताच्या मेसेजला रिप्लाय म्हणून पाठवू शकतो. याला कस्टम मेसेज देखील म्हणतात. जर युझर फोनपासून दूर असेल किंवा प्रवासात असेल तर युझरला मेसेज करण्यासाठी फोन उचलण्याची गरज नाही. या फिचरच्या माध्यमातून सेट केलेला मेसेज रिप्लाय म्हणून संबंधित व्यक्तीपर्यंत सहज पोहोचेल.

हे वाचा - Alert! बनावट FASTag ची होतेय विक्री; फक्त इथूनच खरेदी करा वैध फास्टॅग

या ऑटो रिप्लाय फिचरचा उपयोग व्हॉट्सॲप, सिग्नल, टेलिग्राम तसेच अन्य मेसेजिंग अॅपमध्ये कसा करता येतो, याबाबत अधिक जाणून घेऊया

हे फिचर या अॅप्समध्ये इनबिल्ट (Inbuilt) नाही. त्यामुळे या फिचरचा वापर करण्यासाठी थर्डपार्टी अॅपचा (Third Party App) वापर करावा लागणार आहे. थर्ड पार्टी अॅपमुळे युझर्सला किवर्ड बेसवर संपर्कातील व्यक्ती तसंच ग्रुपला रिस्पाॅन्स देऊ शकणार आहेत. त्यामुळे अॅपनुसार हे फिचर कसं कार्यान्वित करता येते ते पाहूया.

सर्वप्रथम फोनमधील प्रत्येक अॅपसाठी ऑटो रिप्लाय (Auto Reply) किंवा ऑटो रिस्पाॅन्डर (Auto Responder) अॅप डाऊनलोड करून इन्स्टाॅल करा.

हे वाचा - Instagram Alert! मित्रांना असा मेसेज केल्यास थेट बंद होणार तुमचं अकाउंट

त्यानंतर अॅप सुरू करून हे फिचर एनेबल (Enable) करावं. त्यासाठी टाॅगल ऑन करणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हाताळू शकता.

त्यानंतर ऑटोमेटेड रिप्लाय हा ऑप्शन सिलेक्ट करून युझर त्याला हवा तो मेसेज सेट करू शकतो.

मेसेज सेट झाल्यावर सेव्ह चेजेंस करावं. त्यानंतर ऑटो रिप्लायला वर्क कीवर्ड बरोबर सेट करू शकता.

First published:
top videos

    Tags: Signal, Whatsapp