मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Netflix पाहायचंय तर 'आत्मनिर्भर' व्हा! एक अकाउंट पासवर्ड शेअर करुन वापण्यावर येणार मर्यादा

Netflix पाहायचंय तर 'आत्मनिर्भर' व्हा! एक अकाउंट पासवर्ड शेअर करुन वापण्यावर येणार मर्यादा

नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन (Subscription) एकट्याला परवडत नाही म्हणून दोन-तीन मित्रमैत्रिणी मिळून एकच अकाउंट वापरणं सध्या फार सामान्य झालं आहे. पण आता 'जो तेरा है वो मेरा है' हे फ्रेंडशिपचं तत्त्व 'नेटफ्लिक्स'च्या बाबतीत विसरावं लागण्याची शक्यता आहे

नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन (Subscription) एकट्याला परवडत नाही म्हणून दोन-तीन मित्रमैत्रिणी मिळून एकच अकाउंट वापरणं सध्या फार सामान्य झालं आहे. पण आता 'जो तेरा है वो मेरा है' हे फ्रेंडशिपचं तत्त्व 'नेटफ्लिक्स'च्या बाबतीत विसरावं लागण्याची शक्यता आहे

नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन (Subscription) एकट्याला परवडत नाही म्हणून दोन-तीन मित्रमैत्रिणी मिळून एकच अकाउंट वापरणं सध्या फार सामान्य झालं आहे. पण आता 'जो तेरा है वो मेरा है' हे फ्रेंडशिपचं तत्त्व 'नेटफ्लिक्स'च्या बाबतीत विसरावं लागण्याची शक्यता आहे

पुढे वाचा ...

    मुंबई, 12  मार्च: आलेली झोप उडवून, मध्यरात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही नेटफ्लिक्सवर (Netflix) वेबसीरिज पाहता का? नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन (Netflix Subscription) एकट्याला परवडत नाही म्हणून दोन-तीन मित्रमैत्रिणी मिळून एकच अकाउंट वापरणं देखील आता सामान्य झालं आहे. असं असलं तर लवकरच तुमची झोप नेटफ्लिक्स पाहायला न मिळाल्यामुळे उडण्याची शक्यता आहे. कारण नेटफ्लिक्स आता पासवर्ड शेअरिंगवर (Password Sharing) बंधन आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठीच्या काही चाचण्याही छोट्या स्वरूपात घ्यायला कंपनीने सुरुवात केली आहे.

    सध्या नेटफ्लिक्सच्या काही युजर्सना मेसेज येत आहेत, की ते वापरत असलेल्या अकाउंटच्या मूळ युजरसह ते एकाच घरात राहतात का? ते सिद्ध करण्यासाठी मूळ युजरला टेक्स्ट मेसेज किंवा ई-मेल पाठवून त्यातील माहिती भरण्यास सांगितली जात आहे.

    ही व्हेरिफिकेशनची (Verification) प्रक्रिया सध्या तरी युजर्सना स्कीप करता येत आहे. तसंच त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून नेटफ्लिक्स वापरता येतं आहे. ते पुन्हा नव्याने नेटफ्लिक्स ओपन करतात, तेव्हा त्यांना पुन्हा तो मेसेज येतो. याच्याच पुढचा टप्पा म्हणजे यापुढे या युजर्सना नेटफ्लिक्स त्यापुढेही पाहायचं असेल, तर स्वतःचं अकाउंट काढावं लागू शकेल.

    'नेटफ्लिक्सचं अकाउंट वापरणाऱ्या व्यक्ती खरंच अधिकृतपणे ते वापरत आहेत का, हे तपासणं सोपं होण्यासाठी ही टेस्ट तयार करण्यात आली आहे,' अशी माहिती नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने दिली.

    (हे वाचा-मी नाही तुम्हीच आयुष्यभर करा माझं पालनपोषण! 41 वर्षीय इसमाने पालंकावरच भरला खटला)

    नेटफ्लिक्स ही जगातली सर्वांत मोठी स्ट्रीमिंग सर्व्हिस (Streaming Service) आहे. अमेरिकेत 1997मध्ये ऑनलाइन पद्धतीने डीव्हीडी देण्याचा व्यवसाय करणाऱ्या रीड हेस्टिंग्ज (Reed Hastings) आणि सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत बदलत्या काळानुसार स्वतःच्या सेवेत बदल केले. हळूहळू जुने टीव्ही शोज, चित्रपट, नंतर स्वतःच्या सीरिज, स्वतःचे चित्रपट अशा टप्प्यांनी हळूहळू त्यांनी मनोरंजन विश्वावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे.

    मात्र एकच अकाउंट वेगवेगळे युजर्स वापरत असतील, तर ते एकाच घरात राहत असले पाहिजेत, म्हणजेच एकाच कुटुंबाचे सदस्य असले पाहिजेत, अशी नेटफ्लिक्सच्या सेवेची अट आहे. अजून तरी नेटफ्लिक्स आणि अन्य स्ट्रीमिंग सेवांनी या शेअरिंगवर बंधनं आणण्यासाठी फार काही केलेलं नाही. इथून पुढचे दिवस मात्र तसे असणार नाहीत, याची चिन्हं नेटफ्लिक्सच्या आताच्या चाचणीवरून दिसत आहेत. बिझनेसवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

    थोडक्यात सांगायचं तर, 'जो तेरा है वो मेरा है' हे फ्रेंडशिपचं तत्त्व आता 'नेटफ्लिक्स'च्या बाबतीत चालणार नाही, याची मानसिकता तयार करावी लागणार आहे. नेटफ्लिक्स पाहायचं असेल, तर 'आत्मनिर्भर' होण्याला पर्याय नाही, याचेच हे संकेत आहेत.

    First published:

    Tags: Complimentary subscription, Entertainment, Friendship, Netflix, Password, Sharing