मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Netflix सब्सक्रायबर्ससाठी Good News! आता गेमिंग अ‍ॅप मिळणार मोफत

Netflix सब्सक्रायबर्ससाठी Good News! आता गेमिंग अ‍ॅप मिळणार मोफत

नेटफ्लिक्स एक व्हिडीओ गेम सर्व्हिस लाँच (Gaming Service) करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही नेटफ्लिक्स सब्सक्रायबर असाल तर तुम्हाला मोफत हा गेम खेळता येणार आहे.

नेटफ्लिक्स एक व्हिडीओ गेम सर्व्हिस लाँच (Gaming Service) करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही नेटफ्लिक्स सब्सक्रायबर असाल तर तुम्हाला मोफत हा गेम खेळता येणार आहे.

नेटफ्लिक्स एक व्हिडीओ गेम सर्व्हिस लाँच (Gaming Service) करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही नेटफ्लिक्स सब्सक्रायबर असाल तर तुम्हाला मोफत हा गेम खेळता येणार आहे.

मुंबई, 21 जुलै: सध्या ओटीटीचा (OTT) सुवर्णकाळ सुरू आहे. चित्रपट-वेबसीरिजचा खजाना ऑनलाइन उपलब्ध आहे. अशावेळी काही ठराविक प्लॅटफॉर्म्सना युजर्सकडून विशेष पसंती दिली जाते. यापैकी नेटफ्लिक्स (Netflix) हा सध्या घराघरात पोहोचलेला आणि जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध असणारा व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात. आता नेटफ्लिक्स एक व्हिडीओ गेम सर्व्हिस लाँच (Gaming Service) करण्याच्या तयारीत आहे. मीडिया अहवालांच्या मते तुम्ही नेटफ्लिक्स सब्सक्रायबर (Netflix Subscribers) असाल तर तुम्हाला मोफत हा गेम खेळता येणार आहे. तसंच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही सेवा केवळ स्मार्टफोन्सपुरती मर्यादित असणार आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, कंपनीने एका दिवसापूर्वी ही बाब कन्फर्म केली आहे की त्यांनी गेमिंगची जबाबदारी सांभाळण्यासाठी फॉर्मर EA आणि Oculus executive Mike Verdu ची नियुक्ती केली आहे. असा अंदाज बांधण्यात येत आहे की अंतिम स्वरुप देऊन अँड्रॉइड आणि अॅपलसाठी हा गेमिंग प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर तो अॅपल ऑर्केडला (apple arcade) टक्कर देणारा ठरेल. मात्र अद्याप यामध्ये कोणत्या प्रकारच्या गेमची सुरुवात केली जाणार आहे हे गुलदस्त्यात आहे.

हे वाचा-Post Office ची ही योजना ठरेल फायद्याची, कमी गुंतवणुकीतून कसे मिळतील 16 लाख?

नेटफ्लिक्सचं मार्केट सध्या विस्तारत आहे. दुसऱ्या तिमाहीत या प्लॅटफॉर्मच्या महसुलात 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण व्यवहार कसा होता, त्याबाबत सांगताना नेटफ्लिक्सने अशी माहिती दिली आहे की गेमिंग हा चांगला कंटेट आहे. सध्या नेटफ्लिक्सकडे जगभरात 20.9 कोटी पेड सब्सक्रायबर्स आहेत. जे आर्थिक वर्ष 2021 च्या अखेरपर्यंतच्या अंदाजापेक्षा जास्त आहेत. कंपनीने असं म्हटलं आहे की या 20.9 कोटी पेड सब्सक्रायबर्सना कोणत्याही शुल्काशिवाय गेंमिंग प्लॅटफॉर्म वापरता येईल.

First published:

Tags: Game, Netflix, OTT