मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /फोन फ्लाईट मोडमध्ये नसल्यास विमान अपघात होऊ शकतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती

फोन फ्लाईट मोडमध्ये नसल्यास विमान अपघात होऊ शकतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती

विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवण्यास सांगतात तरी फेसबुक लाइव्ह कसं शक्य झालं? फोन फ्लाईट मोडमध्ये असूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते का?

विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवण्यास सांगतात तरी फेसबुक लाइव्ह कसं शक्य झालं? फोन फ्लाईट मोडमध्ये असूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते का?

विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवण्यास सांगतात तरी फेसबुक लाइव्ह कसं शक्य झालं? फोन फ्लाईट मोडमध्ये असूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते का?

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 17 जानेवारी : नेपाळमधील पोखरा विमानतळाकडे जाणाऱ्या नेपाळी प्रवासी विमानाचा रविवारी (15 जानेवारी) भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण 72 जणांचा मृत्यू झाला आहे. या भयानक अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विमानातील एक प्रवासी फ्लाइटच्या लँडिंगचं फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीम करत असल्याचं दिसत आहे. हे लाइव्ह सुरू असतानाच विमान कोसळलं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवण्यास सांगतात तरी फेसबुक लाइव्ह कसं शक्य झालं? फोन फ्लाईट मोडमध्ये असूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते का? जर नसेल मिळत तर अपघाताचा लाइव्ह व्हिडिओ कसा कॅप्टर झाला? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. 'आज तक'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  व्हायरल होत असलेला व्हिडिओ कसा मिळाला?

  फेसबुकवरील लाईव्ह व्हिडिओ शेअर होत नाही तोपर्यंत तो संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईलवर शेअर केला जात नाही. संबंधित प्रवाशाचा फोन रिकव्हर झाल्यानंतर त्यातून हा व्हिडिओ मिळाल्याचं म्हटलं जात आहे. बरेच लोक अशी शक्यता वर्तवत आहेत की, कोणीतरी या लाइव्ह व्हिडिओचं रेकॉर्डिंग केलं होतं. मात्र, लाइव्ह व्हिडिओच्या रेकॉर्डिंगची शक्यता फारशी योग्य वाटत नाहीत. कारण, एखाद्या मित्राच्या फेसबुक लाइव्ह व्हिडिओचं रेकॉर्डिंग करण्याची क्रिया क्वचितच होते. याशिवाय, जर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा लाइव्ह व्हिडिओचं स्क्रीन रेकॉर्डिंग असेल, तर लाइव्ह व्हिडिओच्या दर्शकांची संख्या आणि व्हायरल व्हिडिओमधील दर्शकांची संख्या सारखीच असायला पाहिजे. जी या व्हिडिओमध्ये दिसत नाही. म्हणजेच हा व्हिडिओ संबंधित मृत प्रवाशाच्या फोनमधून मिळाला आहे.

  हेही वाचा : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर त्याचा शोध का घेतला जातो?

  फ्लाईटमध्ये इंटरनेट सुरू असतं का?

  अनेक फ्लाईटमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाते. इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया चेक करणं, ऑनलाइन व्हिडिओ पाहणे यासारख्या गोष्टी करण्यासाठी इनफ्लाइट वाय-फायचा वापर केला जाऊ शकतो. पण, ज्या फ्लाईटमध्ये इनफ्लाइट वाय-फायची सुविधा दिली जात नाही अशा ठिकाणी प्रवासी टेकऑफ किंवा लँडिंगच्या वेळी फोनचं इंटरनेट वापरतात.

  टेकऑफ किंवा लँडिंगच्या वेळी विमान जमिनीच्या अगदी जवळ असतं त्यामुळे मोबाईल नेटवर्क सहज उपलब्ध होतं. बरेच लोक इंटरनेट वापरण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हे नेटवर्क वापरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओदेखील लँडिंगच्या वेळीच घेण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यावेळी मृत व्यक्तीच्या मोबाईलला नेटवर्क मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तो फेसबुकवर लाईव्ह येऊन आपल्या मित्रांसोबत विमान प्रवासाचा आनंद व्यक्त करत होता.

  हेही वाचा : चावी हरवल्यास बाइक सुरू कशी करायची? हा जुगाड वाचवेल संकटातून

  विमानात फोन बंद किंवा फ्लाईट मोडमध्ये न ठेवणं किती धोकादायक आहे?

  प्रवासादरम्यान फोन स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडमध्ये ठेवण्याची घोषणाही केली जाते. मात्र, बरेच प्रवासी या मार्गदर्शक तत्त्वाचं पालन करत नाहीत. विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाइट मोडमध्ये नसणं हे एखाद्या मोठ्या अपघाताचं कारण ठरू शकतं का? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण, सुरक्षेसाठी या मार्गदर्शक तत्वाचं पालन करणं गरजेचं आहे. फोन सिग्नलमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेअरन्स होऊ शकतो. ही बाब विमानाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे रेडिओ अल्टिमीटरमध्येदेखील अडथळा येऊ शकतो.

  5G धोकादायक ठरू शकतं का?

  रेडिओ अल्टिमीटरचा वापर करून, पायलट विमानाच्या जमिनीपासूनच्या उंचीबद्दल माहिती मिळवतो. विमानात एक किंवा दोन फोन सुरू ठेवल्यानं यावर विशेष परिणाम होत नाही. पण, जर प्रत्येकाचा फोन सुरू असेल, रेडिओ अल्टिमीटरच्या सिग्नलमध्ये अडचणी जाणवू शकतात.

  रीडर्स डायजेस्टच्या एका बातमीत पायलट रायन यांच्या हवाल्यानं सांगण्यात आले आहे की, जर फ्लाईटमध्ये 5G फोन असेल आणि तो फ्लाईट मोडमध्ये नसेल तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. 5Gमुळे विमानाच्या रेडिओ अल्टिमीटर अँटेनाला चुकीचे सिग्नल मिळण्याची शक्यता असते. कदाचित धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असलेल्या विमानाच्या उंचीची चुकीची आकडेवारी मिळू शकते. त्याचा परिणाम खूप भयावह असू शकतो.

  First published:

  Tags: Mobile