मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर त्याचा शोध का घेतला जातो?

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर त्याचा शोध का घेतला जातो?

ब्लॅक बॉक्स हे विमानात असलेलं एक डिव्हाईस आहे. ते एअरक्राफ्ट व फ्लाइट पॅरामीटर्सच्या परफॉर्मन्सची नोंद ठेवतं. त्यात इतर अनेक फॅक्टर्स रेकॉर्ड होतात.

ब्लॅक बॉक्स हे विमानात असलेलं एक डिव्हाईस आहे. ते एअरक्राफ्ट व फ्लाइट पॅरामीटर्सच्या परफॉर्मन्सची नोंद ठेवतं. त्यात इतर अनेक फॅक्टर्स रेकॉर्ड होतात.

ब्लॅक बॉक्स हे विमानात असलेलं एक डिव्हाईस आहे. ते एअरक्राफ्ट व फ्लाइट पॅरामीटर्सच्या परफॉर्मन्सची नोंद ठेवतं. त्यात इतर अनेक फॅक्टर्स रेकॉर्ड होतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 17 जानेवारी : नेपाळमध्ये रविवारी विमान दुर्घटना झाली. या घटनेत चार क्रू मेंबर्ससह 68 प्रवाश्यांचा मृत्यू झाला. काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण करणारं यती एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान रविवारी सकाळी शहरातील नायगाव इथं कोसळलं. हे विमान कोसळल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नेपाळ सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे.

    अपघात हा तांत्रिक कारणांमुळे झाला की मानवी चुकीमुळे झाला याचा तपास ही चौकशी समिती करेल. तपास पूर्ण झाल्यावर अपघाताचं नेमकं कारण समोर येईल. हा तपास करण्यासाठी टीम विमानातील ब्लॅक बॉक्सच्या मदतीने कारणांचा शोध घेईल. तर, या ब्लॅक बॉक्समध्ये असं काय असतं, ज्या माध्यमातून अपघाताचं कारण कळतं, तो ब्लॅक बॉक्स कोणत्या रंगाचा असतो, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

    ब्लॅक बॉक्स काय असतो?

    ब्लॅक बॉक्स हे विमानात असलेलं एक डिव्हाईस आहे. ते एअरक्राफ्ट व फ्लाइट पॅरामीटर्सच्या परफॉर्मन्सची नोंद ठेवतं. त्यात इतर अनेक फॅक्टर्स रेकॉर्ड होतात. हा बॉक्स एअरस्पीड, अल्टिट्युड, व्हर्टिकल एक्सलरेशन आणि फ्युएल फ्लो रेकॉर्ड करतं. यामध्ये दोन काँपोनंट्स असतात. एक काँपोनंट फ्लाइट डेटा रेकॉर्डर व एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतो. सीव्हीआर कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड करतो. यामध्ये पायलट्सचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी होणारा संवाद रेकॉर्ड केला जातो. सीव्हीआरमध्ये फक्त दोन तासांचं कॉकपिट रेकॉर्डिंग होऊ शकतं. एका फिक्स टाइमने त्याला नवीन डेटासह रिप्लेस केलं जातं. तर, एफडीआरमध्ये 25 तासांपर्यंतचा फ्लाइट डेटा स्टोअर होतो.

    हेही वाचा : चावी हरवल्यास बाइक सुरू कशी करायची? हा जुगाड वाचवेल संकटातून

    ऑरेंज रंगाचा असतो ब्लॅक बॉक्स

    ब्लॅक बॉक्स साधारणपणे विमानाच्या मागील बाजूस बसवला जातो. हा सर्वांत कमी प्रभावित भाग असल्याने तो अपघातात वाचतो, असं म्हटलं जातं. हा बॉक्स खूप टिकाऊ असतो आणि 3,400 Gs किंवा ग्रॅव्हिटेशनल अ‍ॅक्सलरेशनमध्येही टिकू शकतो. तसेच तो 1100 °C टेम्परेचर आणि 20,000 फूट डेप्थ अंडर वॉटर प्रेशर सहन करू शकतो. ब्लॅक बॉक्स फक्त नावापुरताच ब्लॅक असतो, पण त्याचा रंग ऑरेंज असतो.

    ANC ATR 72 मध्ये ब्लॅक बॉक्स शोधून शोधून विमान योग्य अॅल्टिट्युडवर उडत होतं की नाही, याचा शोध घेतला जातो. तसेच ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर फ्लाइट उडवताना पायलटला लो फ्युएल किंवा कम्युनिकेशनमध्ये कोणती अडचण आली होती का, याबद्दलही कळतं. याच्या आधारे अपघाताचं कारण निश्चित करता येऊ शकतं व त्यामुळे पुढे काळजी घेता येते.

    First published:
    top videos

      Tags: Nepal