मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

वाय-फाय चोरीच्या उद्देशानं शिकला हॅकिंग; इन्स्टाग्राममधील बग शोधून मिळवलं 43 लाखांचं बक्षीस

वाय-फाय चोरीच्या उद्देशानं शिकला हॅकिंग; इन्स्टाग्राममधील बग शोधून मिळवलं 43 लाखांचं बक्षीस

वाय-फाय चोरीच्या उद्देशानं शिकला हॅकिंग; इन्स्टाग्राममधील बग शोधून मिळवलं 43 लाखांचं बक्षीस

वाय-फाय चोरीच्या उद्देशानं शिकला हॅकिंग; इन्स्टाग्राममधील बग शोधून मिळवलं 43 लाखांचं बक्षीस

नीरजला बग सापडल्यामुळे इन्स्टाग्राम युजर्सचं अकाउंट हॅक होण्यापासून वाचेल. नीरजच्या या कामगिरीसाठी त्याला 43 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे.

मुंबई, 19 सप्टेंबर: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) मानले जातात. जगभरात अब्जावधी युजर्स या प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात. यापैकी इन्स्टाग्राम (Instagram) विशेष लोकप्रिय प्लॅटफॉर्म मानला जातो. इन्स्टाग्रामवरून युजर्स प्रामुख्यानं, फोटो, व्हिडिओ, रील्स शेअर करत असतात. काही वेळा हे प्लॅटफॉर्म्स युजर्सच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं चर्चेत असतात. हे प्लॅटफॉर्म तुलनेनं मोठे असल्याने त्यात एखादा बग असतोच. मात्र हा बग युजर्सच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. हे बग शोधून काढणं काहीसं अवघड मानलं जातं. पण राजस्थानमधल्या एका युवकानं इन्स्टाग्रामच्या वेबसाईटवरील एक बग शोधून काढला. या युवकाच्या कामगिरीसाठी त्याला इन्स्टाग्रामकडून 43 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. पण या युवकाची कहाणी काहीशी हटके आहे. खरं तर शेजाऱ्याचं वाय-फाय चोरून वापरण्यासाठी हा तरुण हॅकिंग शिकला होता. त्याचाच त्याला वेगळ्या पद्धतीने फायदा झाला. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राहणाऱ्या नीरज शर्मा (Neeraj Sharma) नावाच्या युवकानं इन्स्टाग्राममध्ये असलेला एक बग शोधून काढला आहे. नीरजला बग सापडल्यामुळे इन्स्टाग्राम युजर्सचं अकाउंट हॅक (Hack) होण्यापासून वाचेल. नीरजच्या या कामगिरीसाठी त्याला 43 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. वास्तविक 20 वर्षांच्या नीरजला इन्स्टाग्राममध्ये एक बग सापडला होता. या बगमुळे युजर्सचं अकाउंट लॉगइन आयडी आणि पासवर्डशिवाय थंबनेलमध्ये रुपांतरित करता येऊ शकत होतं. तथापि, नीरजला हा बग अगदी वेळेत सापडला आणि त्यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेला असलेला धोका टळला. प्लॅटफॉर्मवर एवढी मोठी चूक सापडल्याचं समजताच इन्स्टाग्राम आणि फेसबुकनं नीरजचं कौतुक केलं. नीरजने एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बग शोधून काढण्याची कहाणी सांगितली आहे. या मुलाखतीत नीरज म्हणाला, "लॉकडाउन दरम्यान मी `मिस्टर रोबो` ही अमेरिकी सीरिज पाहिली. या सीरिजमधले हॅकिंगचे सीन्स पाहून मी खूप प्रभावित झालो. यावेळी मी शेजाऱ्याचं वाय-फाय  हॅक करण्याचा निश्चय केला. इंटरनेट सुरळीत चालणं हे त्यामागचं कारण होतं. मी वाय-फाय हॅक कसं करायचं हे ऑनलाइन शिकू लागलो. हॅकिंग संदर्भात अनेक लोकांकडून माहिती घेतली. जेव्हा मी माझ्या शेजाऱ्याचं वाय-फाय हॅक केलं, तेव्हा मला यात यश मिळाल्याची जाणीव झाली." हेही वाचा- एक नंबर! आता WhatsAppवर पाठवलेले मेसेज करु शकाल Edit! लवकरच येत आहे नवीन फीचर नीरज म्हणाला, "मागील वर्षी डिसेंबर महिन्यापासून मी इन्स्टाग्राममधल्या चुका शोधून काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर 31 जानेवारीला सकाळी मला या बगचा शोध लागला. त्यानंतर दिवसभर मी या बगचं टेस्टिंग केलं आणि त्याचा एक रिपोर्ट तयार केला. त्यानंतर हा रिपोर्ट मी फेसबुकला पाठवून दिला. तीन दिवसांनंतर फेसबुकनं माझ्या रिपोर्टला रिप्लाय दिला आणि मला टेस्ट करण्यास सांगितलं." "इन्स्टाग्राममध्ये असा एक बग होता, ज्या माध्यमातून कोणत्याही युजरच्या अकाउंटमध्ये जात थंबनेल बदलता येणं शक्य होतं. हे काम करण्यासाठी फक्त रीलचा मीडिया आयडी हवा होता. मीडिया आयडीच्या (Media ID) माध्यमातून थंबनेलसारखा बदल अगदी सहजपणे करणं शक्य होतं. युजरनं त्याचा पासवर्ड किती स्ट्रॉंग ठेवला आहे, हे यासाठी फारसं महत्त्वाचं नव्हतं. या प्लॅटफॉर्मवरील मार्क झुकरबर्गपासून ते अन्य कोणत्याही युजरचं अकाउंट थंबनेलमध्ये बदलता आलं असतं," असं नीरजनं सांगितलं. "मी पाच मिनिटांच्या आत थंबनेल बदलला. लवकरच माझा रिपोर्ट मंजूर झाला आणि मग मला फेसबुककडून एक मेल आला. यात मला त्यांच्याकडून 49,500 डॉलर देण्यात आल्याची माहिती मिळाली. मला बक्षीस देण्यास उशीर झाला. पण यासाठी मला 4500 डॉलर देण्यात आले. अशाप्रकारे मला एकूण 43 लाख रुपये मिळाले," असं नीरज शर्मानं सांगितलं.
First published:

Tags: Instagram, Tech news

पुढील बातम्या