नवी दिल्ली, 5 जुलै : त्सुनामी (Tsunami) हा शब्द अनेकांनी समुद्रातील पाण्याच्या अक्राळविक्राळ रुपाबद्दल ऐकलेला असतो. समुद्रात येणारी अवाढव्य लाट म्हणजे त्सुनामी हे तर खरंच आहे. मात्र अशी त्सुनामी केवळ समुद्रात येत नाही, तर ती अंतरिक्षातही येते, हे नासानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका फोटोतून समोर आलंय.
अंतराळात म्हणजे ‘ब्लॅक होल’मध्ये (Black Hole) त्सुनामी आल्याचं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं (Nasa) टिपलं आहे. अतिविशाल अशा ब्लॅक होलमध्ये अनेक गॅसचं मिश्रण (Mixture of gasses) होऊन भलेमोठे तरंग तयार झाले आणि ब्लॅक होलमधील गुरुत्वाकर्षाच्या प्रभावापासून वाचून ते निघूनही गेले, असं नासानं दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे.
अशी आली अंतराळातील त्सुनामी
समुद्रात जशी पाण्याची त्सुनामी येते, तशी अंतराळात येणारी त्सुनामी ही वेगवेगळ्या गॅसेसची असते. अऩेक गॅसेस एकमेकांच्या संपर्कात येऊन मोठी रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्यातून त्सुनामीचा जन्म होत असल्याचं सांगितलं जातं. ही त्सुनामी जेव्हा तयार होते, तेव्हा सूर्यापेक्षाही दहापट गरम हवा तयार होते आणि इतक्या प्रचंड उष्णतेत गॅसवर प्रक्रिया होऊन तरंग तयार होतात. या तरंगांमधून वेगवेगळे रंग बाहेर पडतात. असे काही रंगदेखील नासानं टिपलेल्या फोटोमध्ये दिसून येतात.
View this post on Instagram
समुद्र आणि अंतराळातील त्सुनामीत साम्य
समुद्रात येणारी त्सुनामी आणि अंतरिक्षातील त्सुनामी या एकमेकांना समांतर असल्याचं नासाचे शास्त्रज्ञ सांगतात. त्यांच्या लाटांमध्येदेखील एक प्रकारचं साम्य असतं आणि त्यांच्या व्युत्पत्ती, प्रलय आणि ओसरण्याची प्रक्रियाही एकसारखीच असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. या त्सुनामीच्या प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे वायू तयार होतात आणि फोटोत दिसणारे रंग या वायूंचेच रंग असल्याचं सांगितलं जात आहे.
हे वाचा - तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? ; या सोप्या ट्रिक वापरून तपासा
दोन गोष्टींचा जन्म
ब्लॅक होलच्या परिसरात बाहेर पडणारे तरंग दोन गोष्टी जन्माला घालतात. एक म्हणजे त्सुनामी आणि दुसरं म्हणजे नारंगी रंगाचे तरंग. याबाबत शास्त्रज्ञांना अजून पूर्ण स्पष्टचा आली असून त्याचा अभ्यास सुरू आहे. भविष्यातील अभ्यासासाठी नासानं टिपलेली ही छायाचित्र अत्यंत महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणून उपयोगी पडणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.